८५ हजारांचा मुद्देमाल जप्त
अहेरी (Brewery Case) : तालुक्यातील प्राणहिता नदीच्या पात्रात अवैधरित्या दारूभट्टी लावली असल्याची माहिती प्राप्त होताच अहेरी पोलिसांनी काल १८ मे रोजी ८.४५ वाजताच्या सुमारास नदीच्या पात्रात धाड टाकून ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संतोष नागा गौरारप (३९ ) , साधना संतोष गौरारप (३५) दोन्ही रा. मोदुमतुर्रा ता. अहेरी जि. गडचिरोली. ह.मु. इंदाराम ता. अहेरी या पती-पत्नीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकुन ८० हजार रूपये किमतीचा८०० लीटर मोहफुलाचा सडवा, ३,००० रुपये किमतीचे १०० लीटर क्षमतेचे निळ्या रंगांच्या १० प्लास्टीक ड्रम , ६०० रूपये किमतीचा २० किलो काळा गुळ, १५०० रूपयांचे भांडे असा एकंदरीत ८५ हजार १०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील ईज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.