चंद्रपूर (Chandrapur):- चिमूर तालुक्यातील कळमगाव येथील एका घरकुल लाभार्थ्यांकडून घरकुलाची रक्कम देण्यासाठी लाच मागणारा ग्रामिण गृहनिर्माण विभागाचा(Department of Housing) कंत्राटी मिलींद मधुकर वाढई याला १० हजार रूपयाची लाच घेतांना रंगेहाथ अटक करण्यात आली असून त्याचा मित्र मिस्त्रीकाम करणारा आशिष कुशाब पेंदाम यालाही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(Prevention Division) पथकाने ताब्यात घेतले आहे.
६५ हजार देण्यासाठी १० हजाराची घेतली लाच
चिमूर तालुक्यातील कळमगाव येथील रहीवासी असलेल्या तक्रारदारास शबरी आवास योजनेअंतर्गत सन २०२२ – २०२३ या आर्थिक वर्षाकरिता घरकुल मंजुर झाले होते. सदर घरकुल बांधकामाकरीता तकारकर्ता यास चार टप्प्यात बांधकामानुसार रक्कम जमा होणार होती. तक्रारकर्ता यास घरकुल योजनेचे दोन किस्त ६५ हजार रू. जमा झाले असुन तिसरा टप्पा ४५ हजार व चौथ्या टप्याचे २० हजार असे एकुण ६५ हजार रूपये जमा करून देण्याकरिता मिलींद मधुकर वाढई या कंत्राटी अभियंत्याने (Contract Engineer) २० हजार रूपयाची मागणी केली. तडजोडीअंती १० हजार रू. स्विकारण्याचे मान्य करून लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले . त्याचा मित्र आशिष कुशाब पेंदाम यांना ताब्यात घेवुन पुढील तपास कार्य सुरु आहे.