सडक अर्जुनी येथील लाच प्रकरण
गोंदिया (Bribery case) : सडक अर्जुनी नगर पंचायत (Nagar Panchayat) कार्यालयात बांधकामाच्या कार्यारंभासाठी कंत्राटदाराला निविदा रकमेच्या १५ टक्के लाच मागणार्या मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, बांधकाम सभापती, नगरसेवक, नगरसेविकेचा पती व खाजगी इसम अशा सहा जणांना (Anti Bribery Division) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाई करीत अडकविले होते. दरम्यान आरोपींना न्यायालयात हजर केले असता १६ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीनंतर पुन्हा न्यायालयात हजर केले. आरोपींना ३० मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सर्व आरोपींची (Bhandara Jail) भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
आरोपींची भंडारा कारागृहात रवानगी
सडक अर्जुनी नगर पंचायतीत १४ मे रोजी लाचलुचपत विभागाने सापळा कंत्राटदराकडून १ लाख ८२ हजार रुपयाची लाच मागणार्या मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, बांधकाम सभापती, नगरसेवक, नगरसेविकेचा पती व खाजगी इसम अशा सहा जणांना जाळ्यात अडकविले होते. सर्व आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता सहाही आरोपींना १६ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान पोलिस कोठडी संपल्यानंतर आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने ३० मेपर्यंत (Gondia court) न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामुळे सर्व आरोपींची (Bhandara Jail) भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
जामीन अर्ज फेटाळला
लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेले नगराध्यक्ष तेजराम मडावी, प्रभारी मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार शरद हलमारे, बांधकाम सभापती अश्लेश अंबादे, नगरसेवक महेंद्र वंजारी, नगरसेविकाचा पती जुबेर शेख आणि खाजगी इसम शुभम येरणे यांनी पोलिस कोठडी संपल्यानंतर जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावत (Gondia court) न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.