साकोली(Bhandara):- मोजणी करण्याकरीता नवीन पत्राची दमदाटी देऊन जुन्य पत्रावर मोजणी करण्यासाठी लाच मागणारे साकोली भुमिअभिलेख कार्यालयातील भुमिअभिलेख सहाय्यक व लिपीक हे दोघेही दि.२७ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या सापळा कारवाईदरम्यान १५ हजारांची लाच घेतांना अडकले. लिपीक प्रविण गिर्हेपुंजे (३३), तर सहाय्यक राहुल ब्रम्हपुरीकर (४३), असे लाचखोरांचे नावे आहेत. साकोली तालुक्यातील जांभळी येथील तक्रारदारांची भूमापन क्र. ३७७ मध्ये ०.५१ हेक्टर शेती असून सदर शेती निवासी प्रयोजनाकरीता लागणार्या टिपी करीता त्यांनी दि. २९ मार्च २०२३ रोजी नगररचनाकार भंडारा यांच्याकडे अर्ज केला होता.
राहुल ब्रम्हपुरीकर यांनी प्रविण गिर्हेपुंजे यांना तक्रारदारयांचेकडे २० हजार रुपये मागण्यास सांगितले
नगररचनाकार्यालयाकडून (Town Planning Office) तक्रारदार्याच्या अर्जावर कारवाई करुन पुढील कारवाईकरीता (action) तहसीलदार साकोली व उपअधिक्षक भुमिअभिलेख साकोली यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार तक्रारदाराने दि.१६ सप्टेंबर २०२४ रोजी भुमिअभिलेख कार्यालय साकोली येथे नकाशाच्या मोजणीकरीता अर्ज केला होता. त्या अनुषंगाने दि.१७ सप्टेंबर रोजी कार्यालयात गेले असता भुमिअभिलेख कार्यालयातील छाननी लिपीक प्रविण गिर्हेपुंजे यांना भेटले. त्यांना प्लॉटची मोजणी करण्याबाबत नगररचनाकार भंडारा यांनी केलेल्या शिफारशी प्रमाणे विचारणाा केली असता त्यांनी नगररचनाकार यांचे पत्र जुने आहे, ते चालणार नाही, असे सांगितले. त्याकरीता नवीन पत्र आणावे लागेल, असे बोलल्यावर मोजणी करुन देण्याची तक्रारदाराने विनंती केली तेव्हा प्रविण गिर्हेपुंजे व कार्यालयातील सहाय्यक राहुल ब्रम्हपुरीकर यांनी आपसात चर्चा केली. राहुल ब्रम्हपुरीकर यांनी प्रविण गिर्हेपुंजे यांना तक्रारदारयांचेकडे २० हजार रुपये मागण्यास सांगितले. त्यानुसार छाननी लिपीकाने जुन्या पत्रावरुन मोजणी करायची असेल तर दोघांसाठी २० हजार रुपयांची मागणी केली.
मोजणीकरीता मागितली लाच
तक्रारदाराने २५ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. दि.२६ सप्टेंबर रोजी तक्रारीवरुन पळताळणी केली असता पळताळणी दरम्यान दोघाही लोचखोरांनी तडजोडअंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले. दि.२७ सप्टेंबर रोजी सापळा कारवाईदरम्यान गिर्हेपुंजे नामक लिपीकाने स्वत:करीता व राहुल ब्रम्हपुरीकर यांचेकरीता १५ हजार रुपये लाच रक्कम स्विकारतांना अटक केली. सदर कारवाई पोलीस अधिक्षक दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन कदम, संजय पुरंदरे यांचे मार्गदर्शनात पोउप अधिक्षक डॉ. अरुण कुमार लोहार, पोनि अमित डहारे, पोउपनि संजय कुंजरकर, पोहवा मिथून चांदेवार, पोना अतुल मेश्राम, अंकुश गाढवे, पोशि राजकुमार लेंडे, पोना नरेंद्र लाखडे, पोहवा शिलपेंद्र मेश्राम, चेतन पोटे, मयूर सिंगनजुडे, विष्णु वरठी, राहुल राऊत, मपोशि अभिलाषा गजभिये आदिंनी केली आहे.