मूर्तिजापूर सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा
मूर्तिजापूर (Bribery Sarpanch) : तालुक्यातील गट ग्रामपंचायत सालतवाडा येथे तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावाने असलेले पक्या घराचे बक्षिसपत्र देऊन त्यांची ग्रामपंचायत अभिलेखात नोंद करून घराचे ८ अ नमुना काढण्याकरिता सरपंच पती यांनी लाच मागण्याची तक्रार तक्रारदाराने (Bribery Sarpanch) लाच लुचपत विभागाकडे दिली. त्यानुसार २७ फेब्रुवारी रोजी अकोला- अमरावती विभागाचे लाच लुचपत विभागाने सापळा रचला असता, सदर खासगी इसम लाच स्वीकारताना रंगेहात सापळ्यात अडकला.
प्राप्त माहितीनुसार, ग्रामपंचायत सालतवाडा येथे वडिलाच्या नावाने असलेले पक्के घर तक्रारदारास बक्षिसपत्र करून दिले असता त्यांची सत्यप्रत ग्रामपंचायतमध्ये अभिलेखामध्ये नोंद करण्याकरिता दिली होती. त्यांची नोंद करून घराचा ८ अ ची नक्कल मागितली असता सरपंच पती देवानंद गणपत जामनिक (५७) रा. उमई ता. मूर्तिजापूर यांनी ३ हजारांची लाच मागितल्याची तक्रार तक्रारदारांनी लाच लुचपत विभागाकडे २६ फेब्रुवारी रोजी दिली असता त्यांची शहानिशा करण्याकरिता अकोला-अमरावती (Bribery Sarpanch) लाच लुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप, मिलिंद बाहकर, अपर पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे, पोलिस निरीक्षक सचिन सावंत, पोलिस अंमलदार दिगंबर जाधव, किशोर पवार, प्रदीप गावंडे, अभय बावस्कर, नीलेश शेगोकर, श्रीकृष्ण पळसपगार, सलीम खान यांनी २७ फेब्रुवारी सापळा रचला असता मूर्तिजापूर येथील डॉ. आंबेडकर चौकात सदर सरपंच पती हा तक्रारदार यांच्या जवळून लाचेची रक्कम १ हजार रुपये स्वीकारताना रंगेहात सापळ्यात अडकल्याने व तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीवर लाच स्वीकारलेल्या देवानंद जामनिक यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ ए नुसार सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती.
तडजोडीअंती मागितले एक हजार!
त्यात जामनिक यांनी बक्षिसपत्राची नोंद ग्रामपंचायत अभिलेखावर करून घराचा नमुना आठ ‘अ’ देण्याकरीता तडजोडीअंती एक हजार रूपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. या (Bribery Sarpanch) प्रकरणी त्याच्याविरूध्द मूर्तिजापूर शहर पोलिस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे.