भंडारा(Bhandara):- दोन वर्षापूर्वी शेतात तयार केलेल्या बोरवेलची सातबारा व नकाशावर नोंद करण्यासाठी लाच मागणार्या मोहाडी तालुक्यातील नेरी येथील लाचखोर तलाठी अमोल पोरेड्डीवार (४४) याला सातशे रुपयांची लाच रक्कम स्विकारतांना अटक करण्यात आली.
सातबारा व नकाशावर बोरवेलची नोंद करण्यासाठी मागितली लाच
सदर कारवाई दि.९ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(Anti-corruption Division) केली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. मोहाडी तालुक्यातील नेरी शिवारातील शेतीमध्ये तक्रारदाराने दोन वर्षापूर्वी शेतपिकाला सिंचनाची सोय म्हणून बोरवेल तयार केली आहे. सदर बोरवेलची नोंद सातबारा व नकाशावर घेण्याकरीता तक्रारदाराने तलाठी कार्यालय नेरी येथे दि.५ जुलै २०२४ रोजी अर्ज दिला होता. सदर बोरवेलची नोंद सातबारा व नकाशावर करण्यासाठी तलाठी अमोल पोरेड्डीवार यांनी तक्रारदाराला सातशे रुपये लाचे ची मागणी केली. तक्रारदाराने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा येथे केली. तक्रारीवरुन दि.८ जुलै रोजी पडताळणी केली असता तलाठी अमोल पोरेड्डीवार यांनी तक्रारदाराला सातशे रुपयांची लाचेची मागणी केल्याचे आढळून आले. दि.९ जुलै २०२४ रोजी सापळा कारवाई करण्यात आली.
महसूल विभागात खळबळ
कारवाई दरम्यान, लाचखोर तलाठी अमोल पोरेड्डीवार यांनी तक्रारदाराकडून सातशे रुपयाची लाच रक्कम स्विकारतांना एसीबीच्या(ACB) पथकाने अटक केली. याप्रकरणी वरठी पोलीसात गुन्हा दाखल (Filed a case)करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधिक्षक राहुल माकणीकर, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन कदम, संजय पुरंदरे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक डॉ.अरुणकुमार लोहार, पोलीस निरीक्षक अमित डहारे, पोना अतुल मेश्राम, अंकुश गाढवे, पोशि चेतन पोटे, मयूर सिंगनजुडे, विवेक रणदिवे, राहुल राऊत, आदिंनी केली आहे. यावेळी पोउपनि संजय कुंजरकर, पोना शिलपेंद्र मेश्राम, नरेंद्र लाखडे, पोशि विष्णू वरठी, मपोशि अभिलाषा गजभिये, यांनी कारवाईकरीता सहकार्य केले.