मानोरा(Washim):- येथील पंचायत समिती कार्यालयात दलालाचा सुळसुळाट झाला असून कार्यालयात येणाऱ्या शेतकरी (Farmer)व घरकुल लाभार्थ्यांना कामे करून देतो म्हणून त्यांची आर्थिक लूट करीत आहे. अशा दलालाचा पाय बंद करावा, अशी मागणी सर्व सामान्य नागरिकांमधून केली जात आहे.
विविध योजनेतील कामे करून देण्याच्या नावाखाली शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची लूट
शासनाकडून मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर, पंतप्रधान आवास घरकुल यासह विविध योजना सुरू आहेत. विविध योजनेचा लाभ मिळवून देतो म्हणून शासनाच्या विविध योजनेतील कामे करून देण्याच्या नावाखाली शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची लूट करण्यात येत आहे. शासकीय कार्यालयात दलालाची सुळसुळाट वाढल्याने सिंचन विहिरीसाठी १५ हजार तर घराकुलासाठी ५ दलाल मागणी करीत आहे. अशी पंचायत समिती आवरात चर्चा एकावयास येत आहे. शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हे आपला हिस्सा ठेवत दलालांना हाताशी धरून मदत करीत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचा लुटीचा धंदा हा बिनबोट सुरू आहे. सध्या शासनाच्या विविध योजना या ऑनलाइन (Online) मिळवण्याची प्रक्रियाआहे. पण एजंट हे नागरिकांच्याअज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना कागदपत्र मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळत आहेत. पंचायत समिती कार्यालयातील दलालाना रोखण्याची मागणी तालुक्यातील नागरिकाकडून होत आहे.