परभणी/पाथरी (Parbhani):- मोटरसायकल ने कट मारल्याच्या कारणावरून एकास फायटर आणि लोखंडी रॉड (Iron rod) ने मारहाण केल्याची घटना रविवार १६ जुन रोजी शहरातील सराटी पिर दर्ग्याजवळ रात्री १२ च्या सुमारास घडली. या प्रकरणी पाच जणां विरुद्ध जिवेमारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रॉडने डोक्यात आणि कानावर मारहाण करून गंभीर जखमी
मो मोहम्मद नुमान मोहम्मद शकील अन्सारी रा. हुसेन आलम मोहल्ला यांनी पाथरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे . रविवार१६ जुन रात्री ईद(EID)निमित्ताने कपडे खरेदी करण्यासाठी जात असताना शहरातील सराटी पीर दर्ग्याजवळ मोटारसायकलने जोराचा कट मारला. या कारणावरून हमारे एरिया मे क्यू आया, हमारे बच्चे के गाडी को कट क्यू मारा असे म्हणत फायटरने तसेच लोखंडी रॉडने डोक्यात आणि कानावर मारहाण करून गंभीर जखमी (seriously injured) केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर जखमीला पाथरी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर पुढील उपचारा साठी छत्रपती संभाजी नगर(Chhatrapati Sambhaji Nagar) येथे हलविण्यात आले आहे.
दरम्यान या प्रकरणी मस्तखिम कलीम अन्सारी, मुशा वीर उर्फ गुड्डू अन्सारी, कलीम अन्सारी, रफिक अन्सारी आणि रिजवान अन्सारी या पाच जणांवर कलम ३०७ नुसार जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यातील रफिक अन्सारी याला पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
मारहाणीच्या प्रकरणात राजकारण करून माजी नगरसेवक कलीम अन्सारी व इतरांवर ३०७ चा गुन्हा दाखल झाल्याने आमदार बाबाजानी दुराणी यांनी रात्री उशिरा शेकडो कार्यकर्त्या सह पोलिस ठाण्यात जाऊन जाब विचारला व नियमानुसार काम करा अश्या सूचना केल्या.