नवी दिल्ली (BSNL) : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) च्या यूजरसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आपल्या ग्राहकांना मोठा झटका देत, BSNLने प्लॅनची वैधता (Validity plan) 5 दिवसांपर्यंत कमी केली आहे. BSNLने अलीकडेच सिम कार्डची होम डिलिव्हरी सुरू केली आहे. (TelecomTalk) च्या रिपोर्टनुसार, (BSNL) ने आपल्या 88 रुपयांच्या प्लानची वैधता कमी केली आहे.
BSNL च्या 88 रुपयांच्या प्लॅनचे फायदे
BSNL च्या या प्लानची वैधता आधी 35 दिवसांची (35 days) होती. पण आता त्याची वैधता 30 दिवसांवर (30 day) आणली आहे. कंपनी 4G लॉन्च (4G Launch) करण्याचा विचार करत आहे. बीएसएनएलच्या 88 रुपयांच्या प्लॅनची वैधता आता 30 दिवसांची आहे. याशिवाय 10 पैसे प्रति मिनिट दराने कॉलिंग उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये डेटा उपलब्ध नाही. (BSNL) बीएसएनएलचा स्वतः 90 रुपयांपेक्षा कमी प्रीपेड प्लान आहे. इतर खाजगी (TelecomTalk) टेलिकॉम कंपन्यांकडे अशी कोणतीही योजना नाही.