चिखली (Buldhana):- अँड. शंकर शेषराव चव्हाण हे चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये (Assembly constituencies) बहुजन समाज पार्टी च्या पक्षावर उभे आहेत दिनांक 2 नोव्हेंबरच्या रात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांच्या मेहकर पाट्यावरील त्यांच्या घरा समोर रात्रीच्या वेळी सुरुवातीला दहा ते बारा जणांच्या गटाने त्यांच्याशी वाद घातला या वादाची रूपांतर भांडणात झाले व अचानकपणे 40 ते 50 जणांचा जमाव एकत्रित येऊन त्यांच्या सामानाची तोडफोड केली व त्यांना मारहाण (Heating) केल्याची घटना घडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मारहाण केल्याची घटना घडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की दिनांक ०२/११/२०२४ रोजी रात्री ०१.३० वाजण्याचे सुमारास फिर्यादी शंकर शेषराव चव्हाण हे त्यांच्या घरी हजर असताना त्यांना बाहेर काही मुले गोंधळ व धिंगामस्ती करताना दिसून आले तेथे त्यांचे वडील व त्यांच्या हॉटेल (Hotel) वरील काम करणारी मुले. येथे आमचा परिवार राहतो येथे गोंधळ घालू नका असे त्यांना समजावून सांगत असता ती मुले ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती त्यांना समजून सांगत असता त्या मुलांपैकी हर्षल ओमप्रकाश इंगळे, आकाश इंगळे, मयूर मुरडकर, मनोज इंगळे या चौघांनी फिर्यादी शंकर शेषराव चव्हाण यांना व त्यांच्या वडिलांना धक्काबुक्की करून मारहाण केली शंकर शेषराव चव्हाण हे सोडवण्यास गेले असता हर्षल इंगळे यांनी त्याच्या हातातील काठी डोक्यात मारून त्यांना जखमी केले तसेच त्यावरून शंकर शेषराव चव्हाण यांच्या फिर्यादीवरून हर्षल ओमप्रकाश इंगळे, आकाश इंगळे, मयूर मुरडकर, मनोज इंगळे चौघे रा. भानखेड ता. चिखली यांच्या विरोधात पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे शंकर शेषराव चव्हाण हे बसपा विधानसभा निवडणुकीचे उमेदवार आहेत परंतु सदर भांडणाशी त्याचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही असी माहिती पोलिसांनी दिली आहे. फिर्यादीची तक्रार घेऊन गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
गम्मत करीत असताना घडला हा प्रकार
तसेच हर्षल ओमप्रकाश इंगळे वय २९ वर्षे, जात. महादेवकोळी, धंदा शेती हे दिनांक ०१/११/२०२४ रोजी रात्री सुमारास मेहकर फाटा येथे जेवण करण्यास गेले असता मित्र एकमेकांशी हशी गम्मत करीत होते १२:३० वाजता सुमारास शेषराव चव्हाण हे जवळ येऊन म्हणू लागले की. धिंगामस्ती करू नका असे म्हणून त्यांनी शिवीगाळ करु लागले वरून फिर्यादी हे आम्ही इथून जात आहोत तुम्ही शिवीगाळ करू नका असे म्हटले असता त्यांचा मुलगा मिथुन चव्हाण हा तेथे आला व त्यांनी वाद-विवाद सुरू केला तसेच शंकर चव्हाण हा धावत आला त्याचे हातामध्ये लाकडी राफ्टर होते त्यांनी राफ्टरने डोक्यावर मारून जखमी केले तसेच शेषराव चव्हाण व मिथुन चव्हाण यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली असा तोंडी रिपोर्ट प्राप्त झाला असून पुढील गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही(Proceedings) सुरू आहे.