नवी दिल्ली/मुंबई (Budget 2024) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकरी, वृद्ध, तरुण आणि महिलांवर भर देण्यात आला आहे. (Budget 2024) अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्र आणि रेल्वे क्षेत्र वगळता प्रत्येक विभागाला विशेष महत्व देण्यात आले आहे. शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकास क्षेत्र, कृषी क्षेत्रासह प्रत्येक क्षेत्रासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत.
अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्रात काय मिळाले?
-
कृषी क्षेत्र (Agriculture sector) :
– कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत.
– येत्या दोन वर्षांत एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीच्या पद्धतींची ओळख करून दिली जाणार आहे
– एकूण उत्पादन सुधारण्यासाठी भाजीपाला उत्पादन क्लस्टर्स मोठ्या प्रमाणावर स्थापन केले जातील.
– सरकार विशेषत: कृषी क्षेत्रासाठी (Digital Agriculture) डिजिटल कृषी पायाभूत सुविधांवर भर देणार आहे. -
शिक्षण, रोजगार आणि कौशल्य क्षेत्र (Skilling sector) :
– केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 (Budget 2024) मध्ये देशातील शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासासाठी 1.48 लाख कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे.
– देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. हे दर वर्षी 1 लाख विद्यार्थ्यांना ई-व्हाउचरद्वारे 3 टक्के व्याजदराने दिले जाणार आहे.
– सरकार हब-अँड-स्पोक मॉडेलचा वापर करून 1,000 औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITIs) श्रेणीसुधारित करणार आहे.
– अभ्यासक्रमाची सामग्री उद्योग कौशल्य आवश्यकतांसह – संरेखित करेल आणि (Model Skill Loan Scheme) मॉडेल कौशल्य कर्ज योजनेत बदल करण्यात येणार आहे.
– येत्या पाच वर्षांत 20 लाख तरुणांना कौशल्य प्रदान केले जाणार आहे. -
रेल्वे आणि संरक्षण क्षेत्र (Rail and defence sector):
– केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये (Budget 2024) रेल्वे आणि संरक्षण मंत्रालयासाठी कोणतीही विशिष्ट घोषणा करण्यात आलेली नाही.
– निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पात (Railway Budget 2024) रेल्वे अर्थसंकल्पाचा उल्लेखही केलेला नाही. -
पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास क्षेत्र (Infrastructure sector):
– पायाभूत सुविधा क्षेत्रात, सरकारच्या बहुतांश घोषणा बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी करण्यात आल्या आहेत.
– पाटणा-पूर्णिया द्रुतगती मार्ग, बक्सर-भागलपूर द्रुतगती मार्ग, बक्सरमध्ये गंगा नदीवर पूल बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे.
– बजेटमध्ये बिहारला (Social Development sector) विविध योजनांतर्गत 58900 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
– यापैकी 26 हजार कोटी रुपयांचा निधी बिहारमध्ये रस्त्यांचे जाळे टाकण्यासाठी आहे.
– पूरनियंत्रणासाठी 11500 कोटी रुपये आणि वीज प्रकल्पांसाठी 21400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. -
गृहनिर्माण क्षेत्र (Housing sector):
– पीएम आवास योजनेंतर्गत (PM Awas Yojana) शहरी आणि ग्रामीण भारतात 3 कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
– या वर्षी Housing sector ग्रामीण विकासासाठी 2.66 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे.
– 1 कोटी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी घरे बांधली जातील. (Budget 2024) यासाठी 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आहे.