नांदेड (MP Ashok Chavan) : देशाचा एकूण समतोल विकास व्हावा, यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी विकसित भारताची कल्पना मांडली आहे. त्याअनुषंगाने हे अर्थसंकल्प (Budget) त्या दिशेन पडलेल महत्वाच पाऊल आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, गुंतवणूक महाराष्ट्रात यावी, पायाभूत सुविधा अधिक निर्माण व्हाव्यात, शेतकऱ्यांना त्याचा अधिक लाभ व्हावा, सपोर्ट प्राईस देखील केंद्र सरकारने अनेक ठिकाणी वाढवलेली आहे.
त्याचाही बेनिफिट शेतकऱ्यांना व्हावा, अशा अनेक तरतुदी त्या ठिकाणी करण्यात आल्या आहेत. तरुणांना इंटरशिपसाठी सहा हजार ते दहा हजार रुपये महिना देण्याची तरतुद करण्यात आली आहे. राज्यसरकारने होवू घातलेल्या योजनामध्ये लाडकी बहिन योजना (Ladaki Bahin Yojana) असो, गॅस सिलेंडरच्या बाबतीत तरतुद असो त्यामुळे मला अस वाटत की, राज्यातलं महायुतीचं सरकार असो की, केंद्रातलं एनडीएच सरकार असो या दोघांच्याही माध्यमातून देशासाठी प्रगतीच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल टाकण्यात आल आहे. त्याचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवणं ही आमची जबाबदारी असल्याची प्रतिक्रीया खासदार अशोकराव चव्हाण (Ashok Chavan) यांनी आज मंगळवारी नांदेडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.