तालुक्यातील पिंपरी/चुन्नी येथील घटना; पशूपालकाचे आर्थिक नुकसान
तुमसर (Buffalo-Cows died) : तालुक्यातील पिपरी/चुन्नी येथे तुटलेल्या जिवंत विद्यूत तारांच्या स्पर्शाने एक म्हैश व दोन गायी मृत्यू झाल्याची घटना पिपरी/चुन्नी शेतशिवारात ११ जुन रोजी सकाळी आठ वाजता दरम्यान घडली.
घटनेच्या दिवशी येथील पशुपालक दर्याव परसराम पटले रा.पिपरी/चुन्नी हे आपल्या मालकीचे जनावर गावालगत असलेल्या शेतीशिवारात चराई साठी घेऊन गेले असता सदर तिन्ही जनावर शेतशिवारत चरत असताना येथील विद्युत खांबावरील जिवंत विद्यूत तारा तुटून पडल्या होत्या. दरम्यान सदर तुटलेल्या जिंवत विद्युत तारांना एक म्हैश व दोन गायींचा स्पर्श (Buffalo-Cows died) झाल्याने तिन्ही जनावर जागीच गतप्राण झाले.
दरम्यान सदर घटनेची माहिती पशुपालक दर्याव परसराम पटले यांनी गावात दिली व संबंधित विज वितरण कंपनीच्या अधिकार्यांना व कर्मचार्यांनी दिली असता घटनास्थळी वीज वितरण कंपनीचे अधिकारी घटनास्थळी दाखल होत, (Buffalo-Cows died) घटनास्थळाचा पंचानामा केला. सदर घटनेचे नोंद सिहोरा पोलीसात करण्यात आली आहे. सदर घटनेत पशुपालक दर्याव पटले या़चे एक लक्ष वीस हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून नुकसानग्रस्त पशूपालकांना वीज वितरण कंपनीकडून आर्थिक मदत देण्याची मागणी येथिल नागरिकांनी केली आहे.
विज वितरण कंपनीच्या दुर्लक्षितपणामुळे घडताहेत प्राणघातक घटना
सध्या खरीप हंगामातील मान्सूनचे वातारण तयार झाले आहे अशात शेतकरी वर्ग शेतशिवारात बी-बियाणे पेरणीसाठी व शेतीच्या मशागतीसाठी शेतावर सकाळपासून जात असतात. मान्सूनपूर्व वातावरणाच्या वादळ वार्याने कित्येक वृक्ष उन्मळून पडत असतात तर काही ठिकाणी विदयुत खांबावरील विद्युत तार तुटुन पडत असतात परिणामी कीत्येक वेळी प्राणहाणी सुध्दा झाली आहे.
सदर अशा घटना वारंवार घडत असतानाच येथील विज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी नुसते कार्यालयात बसुन कागदावर घोडे नाचवत असतात व बेजबाबदारपणे वागून (Buffalo-Cows died) विद्युत खांब व तारांच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष केंद्रित करीत नाही परिणामी अनेक अशा घटना घडत आहेत. त्यामुळे सदर प्रकरणी दोषी अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.