चिखली (Buldana) :- ई – क्लास जमिनीवर विविध घरकुल योजनेतील घरकुल बांधण्यासाठी परवानगी द्यावी असे मांगनीचे निवेदन दिनांक १९ सप्टेंबर रोजी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे सरपंच संघटनेचे तालुका उपाध्यक्ष रविंद्र डाळीमकर दिले.
प्रत्येक ग्रामपंचायतीला विहित टार्गेटद्वारे यादीनुसार घरकुल मंजूर
शासनाच्या विविध घरकुल योजनेद्वारे मागेल त्याला ‘घरकुल’ या धोरणाने प्रधानमंत्री घरकुल योजना, मोदी आवास घरकुल योजना, रमाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजना, अंतर्गत राज्यात फार मोठ्या प्रमाणावर प्रत्येक ग्रामपंचायतीला विहित टार्गेटद्वारे यादीनुसार घरकुल मंजूर आहेत. परंतु गाव खेड्यातील गोरगरीब नागरिक हे गेल्या ४० ते ५० वर्षापासून गावाला लागून असलेल्या ई-क्लास जमिनीवर अतिक्रमण करून राहत आहे. असे असताना त्यांनी शासनाच्या निवासी दंड भरलेला आहे. शासन मंजूर घरकुलांना बांधकाम करण्यासाठी ई- क्लास जमिनीवर परवानगी देत नाही. संबंधित लाभार्थ्यांकडे जागा उपलब्ध नसल्याकारणाने घरकुलापासून नागरिक वंचित राहत आहे. या गोरगरीब जनतेकडे हक्काचे हक्काचा निवारा नसल्यामुळे फार हालअपेष्ठा सहन कराव्या लागत आहे. वास्तविक पाहता घरकुलासाठी शासन तुट पुंजी रक्कम देते. त्यामुळे घरकुलाची बांधकाम करणे शक्य होत नाही. तरी सुद्धा सदर लाभार्थी जवळची थोडीफार रक्कम जमा करून कसेबसे घरकुल पूर्ण करतात. त्यातही बांधकाम (Construction) सुरू असताना शासनाचे वेळेवर रक्कम मिळत नाही. आज रोजी गेल्या ६ ते ७ महिन्यापासून मोदी आवास योजनेचे १ किंवा २ हफ्त्याच्या रक्कमा जमा झाल्या. त्यानंतर एकही हप्ता लाभार्थ्यांना मिळाला नाही.
तरी नियमित घरकुलांचे देयके देण्यात यावे अशी विनंती सरपंच रविंद्र डाळी मकर यांनी केली आहे.ई-क्लास जमिनीवर शासनाच्या विविध घरकुल योजनेतील घरकुल बांधण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मांगणी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या कडे केली आहे…
