बुलडाणा (Buldana):- उन्हाळा चांगला तापायला लागला असून, सूर्य आग ओकत आहे. जंगलातीला पानवठे (Forest leaves) आटायला लागले असून, जंगलातील हिंस्त्र प्राणी (Wild beasts of the forest) पाण्याच्या शोधात गावाच्या जवळ येऊ लागले आहेत. असाच एक अस्वल पाण्याच्या शोधात जानेफळातील कॅनॉलच्या (Canal) आसपास आढळून आल्याने, एकच खळबळ उडाली.
अस्वलाच्या पाऊलखुणा शोधत पाठलाग
नागरिक गोळा झाले व ही माहिती वनविभागाचे घाटबोरी आर.एफ.ओ. अंकुश येवले मेहकर आर. एफ. ओ. प्रकाश सावळेयांना मिळताच आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल होत, त्यांनी अस्वलाच्या पाऊलखुणा शोधत पाठलाग केला. बराच वेळ शेतात फ़िरत त्यांच्या पथकाने अस्वलाचा शोध घेतला. घुटी रोडवरून हा अस्वल(bear) उटी भागात गेला असावा असा अंदाज व्यक्त करत, वनविभाग अधिकारी यांनी पुढील उपाययोजना केल्या. स्थानिक शेतकरी यांना सतर्क राहण्यासाठी निर्देश देण्यात आले.
अस्वल पाण्याच्या शोधात थेट कॅनॉल जवळ
यावेळी आर. एफ ओ.येवले, मेहकर आर. एफ. ओ. प्रकाश सावळे, विजय मापार, वनरक्षक शिवनारायण पडघान, खेन्ते, वाट, झाटे, बोडणे, लठाड उपस्थित होते. अस्वलाच्या पाऊलखुणा शोधत अस्वलाचा शोध घेण्याचा सर्वांनी अथक प्रयत्न केला. परिसरातील शेतकरी बांधवांनी सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले.