बुलडाणा (buldana):- दरवर्षी प्रमाणे यंदाही बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळ च्यावतीने बुलडाणा अर्बन संस्थेच्या मुख्यालयात ‘श्रीं’ची स्थापना संस्थेचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक व चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ सुकेशजी झंवर यांच्या शुभहस्ते करण्यात आली. बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे हे यंदाचे 23 वे वर्ष आहे. यावेळी संस्थेचे सरव्यवस्थापक श्री कैलाशजी कासट बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष,व सदस्य तसेच मुख्यालयातील सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.