चिखली (Buldana) :- गेल्या काही महिन्यापासून कॅन्सरच्या (Cancer)आजाराने त्रस्त असलेल्या ४८ वर्षीय इसमाने राहत्या घरामध्ये गळफास घेवून जीवनयात्रा संपवली .ही घटना अंत्री खेडेकर येथे २६ सप्टेंबर रोजी सकाळी घडली.
पत्नी व मुलांनी त्यांच्यावर विविध ठिकाणी नेवून औषधोपचार केले
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अंत्री खेडेकर येथील रहिवाशी असलेले देविदास मोतीराम मोरे यांच्याकडे जमीन नसल्याने कामानिमित्त मुला बाळासह मुंबई (Mumbai)येथे गेले होते . त्याच ठिकाणी त्यांची मुले कंपनी मध्ये काम करत असल्याने अनेक वर्षांपासून तेथे राहत असत. मात्र अचानक गेल्या काही महिन्या पासून देविदास मोरे यांना कॅन्सरच्या आजाराची लागण झाली. पत्नी व मुलांनी त्यांच्यावर विविध ठिकाणी नेवून औषध (Medicine) उपचार केला. मात्र मुलांना यश आले नाही त्यामुळे देविदास मोरे हे गेल्या दोन महिन्या पासून गावाकडे आले आणि ते त्यांच्या घरात एकटेच राहत होते. मात्र त्यांना कॅन्सरच्या आजाराचा जास्तच त्रास होवु लागल्याने त्यांनी रात्रीच्या वेळी राहत्या घरामध्ये लोखंडी अँगलला रुमालाच्या साह्याने गळफास घेवून जीवनयात्रा संपवून टाकली.
गळफास घेवून जीवनयात्रा संपविली
सकाळी त्यांची आई सावित्रीबाई मोतीराम मोरे यांनी मुलाच्या घराचा दरवाजा बंद का बराच वेळ झाला तरी सुध्दा उघडला नाही असे पाहून त्यांनी दरवाजा वाजवून आवाज दिला मात्र घरातून आवाज आला नाही म्हणून शेजारी लोक धावत येवून दरवाजा उघडला असता देविदास यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले या घटनेची माहिती पोलीस पाटील रामदास मोरे , कोतवाल महेश मोरे , दिलीप मोरे, भिका खेडेकर यांनी अंढेरा पोलीसांना कळविले . त्यामुळे ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार कैलास उगले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून पंचासमक्ष पंचनामा करून मर्ग दाखल केला . घरातील कर्ता पुरुष गेल्याने आई, पत्नी , व मुलांवरील आधाराचे छत्र हरपले असल्याने गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत .