बुलढाणा(Buldana):- फोटोग्राफर (Photographer) प्रशांत सोनुने, हा अवलिया छायाचित्रकार कधी टेरेसवर तर कधी टॉवरवर जाऊन फोटो खेचणारा हा हरहुन्नरी माणूस. हा इतक्या उंचीवर जाऊन फोटो खेचतो की, ड्रोनची गरज पडतच नाही.. कुठून कोणता अँगल क्लिक करावा, याचं परफेक्ट गेसिंग या धडपड्या माणसाकडे असतं. आता तर फोटो क्लिक करता करता ‘उंबटू उलगुलान’ या त्याच्या युट्युब चॅनेलसाठी (YouTube channel) तो शूटिंगही करतो. म्हणजे एका हातानं फोटो काढणं सुरू, अन् दुसऱ्या हाताने शूटिंग सुरू.. कैकदा उंचीवरून हा पडला, पण धडपडणं मात्र सोडलं नाही.
कैकदा उंचीवरून हा पडला, पण धडपडणं मात्र सोडलं नाही
मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते गुरुवार 19 सप्टेंबर रोजी बुलढाणा शहरात शिवस्मारकासह तब्बल 18 स्मारकांचे लोकार्पण झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांचा भव्य रोड शो आयोजित करण्यात आला होता, रथावर मुख्यमंत्री (Chief Minister) आरुढ होते.. त्याच रथावर चढून त्यांच्याहीपेक्षा उंचीवर जात प्रशांत सोनुने हे फोटो काढत होते अन् शूटिंग करत होते. तर स्मारकस्थळी पोहचल्यावरही ते वर ड्रोन असतानाही वेगवेगळ्या उंचीवरचा अँगल शोधत होते. प्रशांत सोनुने हे अशाप्रकारे फोटो काढत असताना, खालून त्यांचा फोटो खेचला या सर्व कार्यक्रमाची फोटोग्राफी करणारे कल्पक छायाचित्रकार अनुपम झाल्टे यांनी.. अन् आ. संजय गायकवाड यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्यात फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरचीही चर्चा होऊन गेली !