चिखली (Buldana):- 19 सप्टेंबर 2024 रोजी बुलढाणा येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis), अजित दादा पवार आधी जण आले असता शेतकऱ्याच्या समस्या घेऊन शेतकऱ्याच्या रक्तांनी लिहिलेले निवेदन देण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे व त्यांचे सहकारी गेले असता पोलिसांनी त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटू तर दिलेच नाही उलट शेतकऱ्यांच्या रक्तानी लिहिलेले निवेदन इस्कवून घेत फाडून टाकले.
आदर्श गाव सावरगाव डुकरे येथे अन्न त्या आंदोलनाला सुरुवात
या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या रक्ताचा अपमान करणाऱ्या पोलिसावर कारवाई करा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासाठी चिखलीचे माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी 23 सप्टेंबर पासून चिखली तालुक्यातील आदर्श गाव सावरगाव डुकरे येथे अन्न त्या आंदोलनाला सुरुवात केली आहे.
गोरगरिबांच्या सेवेत आयुष्य अर्पण केलेल्या सर्व महापुरुषांना वंदन करून, त्यांच्या प्रेरणेनुसार शेतकऱ्यांच्या रक्ताचा अपमान केल्याच्या निषेधार्थ आदर्श गाव सावरगाव डुक्करे येथे अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांचे हक्क, त्यांच्या कष्टाचे महत्त्व आणि त्यांच्या मागण्या मांडल्या जातात.
अश्या आहेत मागण्याः
- पोलिसांकडून शेतकऱ्यांवर दडपशाही करणाऱ्या गृहमंत्र्यांनी माफी मागावी.
- शेतकऱ्यांचे रक्ताचे पत्र फाडणाऱ्या पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी.
- सोयाबीनला ७००० रु. भाव मिळालाच पाहिजे.
- शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे.
- थकलेला पिकविमा मिळालाच पाहिजे.
- थकलेले सिंचन अनुदान मिळालेच पाहिजे.
- शेतात दिवसा वीज मिळालीच पाहिजे.
- वन्यप्राण्यांपासून संरक्षण मिळालेच पाहिजे.
सर्वांनी एकत्र येऊन या आंदोलनाला सामील होण्याचे आवाहन माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केले आहे, एकजुटीतच खरी ताकद आहे. आपल्या हक्कांसाठी संघर्ष करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. असेही त्यांनी त्यांच्या आवाहनांमध्ये म्हटले आहे.