चिखली(Buldhana):- ओबीसी समाजाच्या (OBC Category)मुलांना या आधी उच्च शिक्षण घेत असताना नॉन क्रिमिलयेर (Non criminal) प्रमाणपत्र असताना देखील फी माफीसाठी 8 लाख उत्पन्न मर्यादेचीही जाचक अट लादण्यात आली होती. यामुळे मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलांना ओबीसी असून देखील मेडिकल कॉलेज,इंजिनिअरिंग कॉलेज तसेच इतरही कोर्सची पूर्ण फी भरावी लागे त्यामुळे पालकांना फार मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सोसावी लागत असे या बाबीचा विचार करून ओबीसी च्या विविध संघटनांनी तालुका ते राज्य पातळीपर्यंत आवाज उठवला होता.
आता द्यावे लागणार फक्त नॉन क्रिमिलेअर..
चिखली तालुका ओबीसी संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ वायाळ तसेच जिल्हा उपाध्यक्ष सुनील धंदर यांच्या नेतृत्वाखाली इतर पदाधिकारी यांच्यासह सर्वांनी वारंवार ही बाब आमदार श्वेताताई महाले तसेच मा उपमुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांचे स्वीय सहाय्यक श्री विद्याधार महाले साहेब यांच्या निदर्शनास आणून दिली होती. या मागणीची दखल घेत ताईंनी सभागृहात देखील आवाज उठवला होता तसेच मा उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावदेखील केला होता.शेवटी 20 सप्टेंबर 2024 रोजी शासनाने एक शासन निर्णय पारित फी माफीसाठी असलेली 8 लाख उत्पन मर्यादा रद्द केली. राष्ट्रीय, राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील संघटनेच्या प्रयत्नाला यश प्राप्त झाले. ताईचे आभार मानण्यासाठी एका सत्कार समारंभाचे अयोजन या निमित्त करण्यात आले. भविष्यात आपण सदैव आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहू असे आश्वासन या वेळी आमदार ताईंनी सर्वांना दिले .
चिखली तालुका ओबीसी अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने आमदार श्वेताताई महाले यांचा सत्कार
यावेळी तालुका अध्यक्ष राजाभाऊ वायाळ जिल्हा उपाध्यक्ष सुनील धंदर, तसेच विरेंद्र वानखेडे, गजानन वायाळ,अनिल वानखेडे, राजेश ठेंग, राम वाघ, रविंद्र नादरकर, संजय घायवट, बाळू गव्हाणे,कलिंम पटेल, राजू जाधव, रघुवीर लहाने, विजय डुकरे, बंगाळे सर, धनवटे सर, सय्यद सर, दिनेश पवार ,गजानन उबरहंडे, बेलोडे साहेब, विनोद ठाकरे, जीवन शेटे,आदीपदाधिकारी उपस्थित होते प्रास्ताविक तालुका अध्यक्ष राजाभाऊ वायाळ यांनी तर आभार राजेश ठेंग यांनी मानले