विधानसभेत जिल्ह्यातून उपस्थित झाले २७६ प्रश्न
बुलढाणा (Buldhana Assembly Election) : विधानसभेत जाण्यासाठी अनेक इच्छुकांची लगबग सुरु असतांना विंâवा ते गुडघ्याला बाशिंग बांधून बसले असतांना, २०१९ मध्ये पाच वर्षासाठी ज्यांना आपण विधानसभेत निवडणून पाठविले होते..त्यांनी काय दिवे लावले? हे सुध्दा तपासायला हवेच.
२०१९ ते २०२४ या पाच वर्षात केवळ १२ आधिवेशन होवून, १३१ दिवस कामकाज चालले. त्यातही अनेकवेळा विविध गोंधळामुळे सभागृहाचा बराच वेळ वाया गेला. या काळात मांडल्या गेलेल्या ३१ हजार ४८४ प्रश्नांमध्ये, त्यातील रिपीट प्रश्न जर सोडले तर खऱ्या अर्थाने मांडल्या गेलेल्या २० हजार ३४९ प्रश्नांपैकी बुलढाणा जिल्ह्यातील ७ आमदार महोदयांनी मांडले केवळ ७२६ प्रश्न.
विधानसभेत (Buldhana Assembly Election) शेती, आरोग्य, शिक्षण, महिला, बालके, आदिवासी समाज, मंदीर व मस्जीद विकास, किल्लेसंवर्धन, अल्पसंख्यांक समाज आदींबाबत प्रश्न उपस्थित केल्या गेले. मुळात प्रश्न विचारणे हे विरोधकांचे कर्तव्य असते, परंतु चौदाव्या विधानसभेत आलटून-पालटून सारेच पक्ष सत्तेत आल्यामुळे प्रश्न विचारणाऱ्या आमदारांमध्ये सत्ताधाऱ्यांचेच नाव जास्त दिसून येत आहे.
बुलढाणा जिल्ह्याचा (Buldhana Assembly Election) विचार केलातर सर्वाधिक प्रश्न विचारले ते मलकापूरचे काँग्रेस आमदार राजेश एकडे यांनी, त्यांनी २७६ प्रश्न उपस्थित केल्याची नोंद आहे. दुसऱ्या क्रमांकावर चिखलीच्या भाजपा आमदार सौ.श्वेताताई महाले असून त्यांनी१३३ प्रश्न उपस्थित केले आहेत.तिसऱ्या क्रमांकावर बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी १२४ प्रश्न उपस्थित केलेले आहेत. मेहकरचे शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांनी ८६, खामगावचे भाजपा आमदार अॅड.आकाश पुंâडकर यांनी ६१, सिंदखेडराजाचे राष्ट्रवादी आ. डॉ. राजेंद्र शिंगणे (MLA Dr. Rajendra Shingane) ३९ तर सर्वात कमी जळगाव जामोद भाजपा आमदार डॉ. संजय कुटे (MLA Dr. Sanjay Kute) यांनी केवळ सात प्रश्न उपस्थित केल्याची नोंद आहे.