राजुर घाटातील वळण रस्त्याचा प्रश्न लागणार मागीं
बुलढाणा (MLA Sanjay Gaikwad) : बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे (Buldhana Assembly) शिवसेनेचे आमदार धर्मवीर संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांच्या विकासाचा झंजावात अजूनही सुरूच आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील विविध महत्त्वाच्या प्रकल्प संदर्भात आज राज्याचे प्रधान सचिवाच्या दालनात बैठक घेण्यात आली. यावेळी मोताळा मार्गावरील राजूर घाटातील वळण रस्त्याचा प्रश्न सह सर्व प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याची आदेश सबंधित विभागांना दिले. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे धडाकेबाज आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांनी विधानसभा परिसरात विकासाचा झंजावात उभा केला आहे. रोज कोणत्या ना कोणत्या कामाचे भूमिपूजन होत आले आहे. राज्यात लवकरच आचारसंहिता लागण्याची चिन्हे आहे. तरीही आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांच्या विकासाचा धडाका सुरूच आहे.
राज्याचे प्रधान साचिवानी दिले आदेश
आज त्यांनी राज्याचे प्रधान सचिव यांच्या दालनात (Assembly Constituency) बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील अनेक महत्त्वाच्या विषयावर बैठक घेतली. यामध्ये (Buldhana Assembly) बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील वनविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या राजुर घाटातील वळण रस्त्यावरील एकतर्फा वाहतूक परिवर्तित करून दुतर्फा रस्ता निर्मिती करणे, बोरखेड – वरवंड बंगला रस्ता तसेच खैरखेड – तरोडा रस्ता, डोंगर खंडाळा गावदरीतील जुन्या पाझर तलावाच्या खालील वनविभागाच्या जमिनीवर नवीन मोठ्या क्षमतेचा साठवण तलाव निर्मिती करणे, तसेच उबाळखेड येथे नवीन साठवण तलावाची निर्मिती करणे, याकरिता लागत असलेल्या जमीन तसेच, खारखेड ते तरोडा ग्रामा ७५ परवानगी मिळणे बाबत प्रकल्प, बुलढाणा शहरात करिता मंजूर अमृत 2.0 योजना अंतर्गत अशुद्ध पाण्याचा शुद्धीकरण प्रकल्पास वनविभागाची जागा मिळावी याकरिता तथा बुलढाणा मोताळा मार्गावरील राजुर घाटात एकेरी वाहतूक बाबत विषयावर चर्चा करून सर्व विषय मार्गी लावण्याची मागणी आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी केली. त्यावर राज्याचे प्रधान सचिव यांनी सर्व विषयाची सविस्तर माहिती घेऊन सर्व प्रश्न तत्काळ मार्गे लागावे याकरिता संबंधित विभागांना तशा सूचना दिल्या आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात विधानसभा मतदारसंघात (Assembly Constituency) विकासाची भर पडणार असल्याचे चित्र बघावस मिळणार आहे..