चिखली (Buldhana) :- येथील बँक ऑफ महाराष्ट्र(Bank of Maharashtra) शाखा मेरा खुर्दचे दुय्यम व्यवस्थापक यांचे कडून नागरिकांसोबत अरेरावी धोरण राबवून त्यांची पिळवणूक केल्या जात असल्याचा प्रकार ४ जुलै रोजी घडला आहे.
बँकेत ग्राहकांचा गोंधळ
चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथे एकमेव बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आहे. या शाखे अंतर्गत सहा ते सात गावे समाविष्ट असल्याने परिसरातील शेतकरी(Farmer), कर्जदार, खातेदार , वयोवृध्द, निराधार यांची दररोज बँकेत गर्दी असते. त्यातच आता शासनाने लाडकी बहिण योजना जाहीर केली. या योजनेचा महिलांना लाभ घेण्यासाठी बँकेच्या पासबुकची आवश्यकता भासत आहे त्यामुळे महिला पासबुक काढण्यासाठी बँकेत गर्दी (Crowd)करत आहे. तसेच निराधार योजनेचे लाभार्थी सुध्दा मानधन घेण्यासाठी बँकेत जात आहे. बँकेत होणारी गर्दी पाहून नुकतेच काही महिन्यापूर्वी रूजू झालेले दुय्यम निबंधक हे ग्राहकासोबत उद्धट वर्तन करत बसून ठेवतात किंवा आज नाही. उद्याला या असे म्हणून घरी पाठवून देतात.
मनमानी करणाऱ्या दुय्यम व्यवस्थापकवर कारवाईची मागणी केली
तसेच शासन पीककर्ज माफी (Peak loan waiver)देण्याच्या प्रयत्नात आहे त्यामुळे थकित पीककर्ज भरणा करू नये असे म्हणुन शेतकऱ्यांना पिककर्जाचे वाटप करत नाही. सुरळीत उत्तर न देता किंव्हा तक्रारीची कोणतेही निवारण न करता ग्राहकासोबत हुज्जत घालतात असा प्रकार घडत असल्याने मोठया प्रमाणावर नागरिकांनी बँकेत गर्दी केली होती. या बाबतीत शाखा दुय्यम निबंधक यांना विचारले असता त्यांनी सागितले की माझी तक्रार करा कारण मला बदली हवी आहे, असे भाषा वापरल्या जाते. त्यामुळे जाणून बुजून ग्राहकासोबत उद्धट वर्तन करून त्रास दिल्या जात आहे . तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेवून अशा मनमानी करणाऱ्या दुय्यम व्यवस्थापकवर कारवाईची मागणी केली आहे.