प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितत प्रवेश!
बुलढाणा (Buldhana BJP) : जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक विश्वविजेताचे संपादक चंद्रकांत बर्दे (Chandrakant Barde) यांनी भारतीय जनता पार्टी (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.
बुलढाण्यातील सामाजिक कार्यकर्ते तसेच दैनिक विश्वविजेता चे संपादक चंद्रकांत बर्दे (Chandrakant Barde) यांचा आज शनिवार 21 सप्टेंबर रोजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्याहस्ते व (BJP) भाजपा लोकसभा प्रमुख तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा प्रवेश केला. यावेळी चिखली विधानसभा मतदार संघाच्या आमदार श्वेताताई महाले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश मांटे, जिल्हा सचिव सुनील देशमुख, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डाॅ. राजेश्वर उबरहंडे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पाटील, (BJP) भाजपा ज्येष्ठ नेते गणेश देहाडराय यांच्यासह जिल्हाभरातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.