चिखली(Buldhana):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) स्वतःला मनसेचे अत्यंत निष्ठावान समजणारे बुलढाणा, अकोला(Akola), वाशिम जिल्हा संपर्क नेते विठ्ठल लोखंडकार यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे.
सडका आंबा गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव साजरा
विठ्ठल लोखंडकार यांच्या काँग्रेस (Congress)प्रवेशाने मात्र मनसेला कोणताही फरक पडलेला नाही. याउलट मनसेमध्ये असलेली अनेक दिवसांची घाण कीड निघून गेली असल्याचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. मनसेने अनेकांना आजवर मोठं-मोठ्या पदावर नेऊन पोहोचविले आहे. आजवर ज्याला गल्लीतल कुत्र सुद्धा ओळखत नव्हत त्याला एका उच्च पदावर राज साहेबांनी नेऊन ठेवले होते. जिल्ह्याच्या संपर्क पदाची जबाबदारी ज्याच्याकडे होती, त्याचा मात्र जिल्ह्यात कोणत्याही कार्यकर्त्या सोबत साधा संपर्क सुद्धा नव्हता. लोखंड कारे हे कायम पक्षविरोधी भूमिका ठेवीत पक्ष वाढीला कोणत्याही प्रकारचा हातभार लावीत नव्हते. आज विठ्ठल लोखंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याने पुन्हा नव्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. लवकरच लोखंडकार यांच्यावर नाराज असलेली कार्यकर्ते आणि नाईलाजास्तव इतर पक्षात काम करणाऱ्या अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आनंद उत्सव साजरा केला असून लवकरच मनसेमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी सांगितले.