चिखली (Buldhana):- एका १० वर्षांच्या चिमुकल्या मुलाचा गळा आवळून खून (Murder)केला आणि नंतर त्याचा मृतदेह पोत्यात भरून शेनाच्या खड्यात दाबून टाकला .ही धक्कादायक घटना अंबाशी येथे २३ जुलै रोजी रात्री ११ वाजता उघडकीस आली.
१० वर्षांच्या चिमुकल्या मुलाचा गळा आवळून खून
मिळालेल्या माहितीनुसार, अंबाशी येथील रहिवाशी असलेले शे हारून शेख गणी त्यांची बहीण कुंटूबासह गावातच झोपडपट्टी मध्ये राहते आणि दूध व्यवसाय करते असे. गावातच बहिन भाऊ राहत असल्याने त्यांचे मुले एकमेकांच्या घरी जाणे येणे करत असत दिनांक २२ जुलै रोजी शे हारून शेख गणी यांचा १० वर्षाचा मुलगा शेख आरहान हा त्यांच्या बहिनीचा मुलगा शेख अन्सार शेख नासेर वय २८ वर्ष हा मामाचा मुलगा शेख आरहान वय १० वर्ष याला २२ जुलै रोजी सोबत घेवून त्यांच्या झोपडपट्टी मध्ये राहत्या घरी घेवून गेला. परंतु तो परत आलाच नाही म्हणून आई वडिलांनी शोध घेतला असता कुठेही मिळून आला नव्हता. या घटनेची माहिती शेख हारून शेख गणी यांनी पोलीस स्टेशनला दिली.
प्रेताची दुर्गंधी येणार नाही म्हणून मृतदेह एका पोत्यात भरून शेणाच्या ठिगाऱ्यात दाबून टाकला
दिलेल्या तक्रारी वरुण पोलिसांनी गुपित सूत्रे फिरवली असता संशयित म्हणून बहिणाचा मुलगा शेख अन्सार शेख नासेर याला ताब्यात घेतले त्याची कसून चौकशी केली असता त्याने पोलीसांना सांगीतले की मी मामाचा मुलगा शेख आरहन याला माझ्या घरी आणले आणि रागाच्या भरात नायलॉन दोरीच्या (nylon string) सहाय्याने त्याचा गळा आवळून खून केला आणि कोणालाही दिसणार नाही व प्रेताची दुर्गंधी येणार नाही म्हणून एका पोत्यात भरून शेणाच्या ठिगाऱ्यात दाबून टाकला. हा प्रकार सागताच पोलिसांनी अंबाशी येथे त्याच्या राहत्या घरी धाव घेवून शेणाच्या ठिगाऱ्यातून मुलाचा मृतदेह(dead body) बाहेर काढला. अशा या धक्कादायक घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. वृत्त लीहेपर्यत लहान मुलाचा खून का केला व त्याच्या पाठीमागचे कारण काय हा प्रकार पोलीस तपासाअंती उघडकीस येणार हे मात्र खरे !