बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकाने केला खुलासा!
– हा प्रताप्रावांसाठी विरोधकांच्या कुटील डाव- खासदार जनसंपर्क कार्यालयाचे पत्रक
बुलडाणा (Buldhana) : बुलढाणा लोकसभा (Buldhana LokSabha) मतदार संघातील मेहकर मध्ये काल रात्री साडेचार कोटी रुपयांची कॅश पकडली असून त्यासोबत धनुष्यबाण चिन्ह असलेले व मतदार यादी असल्याचे वृत्त जे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे, ते पूर्णतः फेक असून मतदारांनी यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन (Buldhana Police) जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी केले आहे. असा कोणताही गुन्हा दाखल झालेला नसून, मतदारांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवता निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन त्यांनी एका व्हिडिओतून केले आहे. तर विजयाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या प्रतापराव जाधव (MP Prataprao Jadhav) यांना बदनाम करण्यासाठी विरोधकांनी रचलेले हे षडयंत्र असून, हा कुटील डाव असल्याचे पत्रक खासदार जनसंपर्क कार्यालयाकडून आले आहे.
बुलढाणा लोकसभा (Buldhana LokSabha) मतदार संघासाठी आज मतदान सुरू झाले असून, काल रात्रीपासून मेहकर येथे तीन शिवसैनिकांना अटक करून त्यांच्या जवळून साडेचार कोटी रुपये एवढी रक्कम हस्तगत करण्यात आली त्याचप्रमाणे त्या शिवसैनिकाकडून धनुष्यबाणाचेे प्रचार साहित्यही जप्त करण्यात आले.. असा एक मेसेज व्हायरल होत आहे. सदर मेसेजची तपासणी केली असता सदर मेसेज फेक असून महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव (MP Prataprao Jadhav) यांना बदनाम करून, त्यांच्या नावाने खोट्या अफवा पसरवून विरोधक आपल्या होणाऱ्या पराभवाचे खापर प्रतापराव जाधव यांच्यावर फोडण्याचे प्रयत्न करताना दिसून येत असल्याचा आरोप खासदार जनसंपर्क कार्यालयातून एका पत्रकाद्वारे करण्यात आला आहे.
त्या पत्रकात पुढे नमूद करण्यात आले आहे की, विरोधकांनी आपला पराभव अगोदरच मान्य केला असून निवडून येण्यासाठी अशा खोट्या अफवांचा आधार त्यांना घ्यावा लागत आहे. यावरून त्यांची मनोवृत्ती अगोदरच पराभूत झाली आहे हे लक्षात येते. सदर मेसेज बद्दल सायबर सेल बुलढाणा (Buldhana LokSabha) येथे तक्रार करण्यात आली असून, सदर मेसेज फेक असल्याचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी स्वतः सांगितले. असे खोटे मेसेज तयार करून ते पसरवणाऱ्याचा शोध (Buldhana Police) पोलीस विभाग घेत असून त्याच्यावर लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी सांगितले. काल संजय गायकवाड यांनी केलेल्या फेसबुक लाईव्ह नंतर महायुतीच्या उमेदवाराला, सर्व स्तरातून आक्रमक असा प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद सहन न झाल्यामुळे विरोधकांनी खोट्या मेसेजचा आधार घेऊन महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव (MP Prataprao Jadhav) यांना बदनाम करून मत मिळवण्याचा जो केविलवाना प्रयत्न चालवला आहे, त्याला सुज्ञ जनता कधीच बळी पडणार नाही, असे खासदार कार्यालयामार्फत सांगण्यात आले आहे.