बुलढाणा (Buldhana Election) : मोदी सरकारने १० वर्षाच्या कार्यकाळात प्रचंड काम करूनही, का कुणास ठाऊक ? पण महाराष्ट्रात या (Buldhana Election) निवडणुकीत सत्तापक्षाच्या विरोधात लाट असतानाही. त्या लाटेचा तडाखा बुलढाणा लोकसभा (Buldhana LokSabha) मतदार संघातील नागरिकांनी महायुतीला बसू न देता मला विजयी केले. त्याबद्दल या मतदारसंघातील जनतेची मानावे तेवढे आभार कमीच आहे. सर्वच (Buldhana Assembly) विधानसभा मतदार संघातील मतदारांनी विश्वास दाखवला, पण २००९ पासून सातत्याने चौथ्यावेळी जळगाव जामोद व खामगाव या दोन विधानसभा मतदार संघांनी मला कुटुंबातील सदस्य समजून याहीवेळी भरभक्कम मतदान करून माझ्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याबद्दल त्यांच्याकडे आभार मानायला शब्दही नसल्याचे नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) यांनी नमूद करून, आता निवडणूक संपली. आरोप- प्रत्यारोपांना तिलांजली देऊया, एकत्र येऊन बुलढाणा जिल्ह्याचे विकासासाठी काम करूया. माझ्याकडून गत १५ वर्षात ज्या काही उणिवा राहिल्या असतील, त्याही भरून काढूया. अशी मोठ्या मनाची भूमिका त्यांनी घेतली आहे.
१५ वर्षात राहिलेल्या काही उणिवा भरून काढू- ना. जाधव
ना. प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) यांनी सोशल माध्यमावर केलेल्या एका पोस्टमध्ये नमूद केले आहे की, (Buldhana LokSabha) बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील माझ्या तमाम मतदार बंधु-भगिनींनो..आपण माझ्यावर विश्वास दाखवत सलग चौथ्यांदा मला लोकसभेत पाठवलं आणि परत आपली सेवा करण्याची संधी दिली तसेच आपल्याच कृपाशीर्वादाने मला केंद्रात मंत्रिपदही मिळालं, याबद्दल मी आपला मनस्वी आभारी आहे. अगदी राज्यभर विरोधी लाट असतानादेखील आपण विचलित न होता माझ्यासोबत ठामपणे उभा राहिलात. माझ्याविरोधी होणाऱ्या चर्चांना आपण मला निवडून आणून पूर्णविराम दिलात. सर्वच (Buldhana Assembly) विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला. विशेषतः खामगाव व जळगाव जामोद विधानसभा मतदार संघातील मतदारांनी मागील १५ वर्षांपासूनतर, जणू मी त्यांच्या घरातील सदस्य असल्याप्रमाणेच ही निवडणूक हाती घेतली होती. त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्याला शब्दही थिटे पडतील. माझ्या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा नेहमीच राहिलेला आहे.
मित्रांनो आता निवडणूक (Buldhana Election) संपलेली आहे. मी तुमचा हक्काचा लोकप्रतिनिधी जरी असलोतरी संबंध जिल्ह्याचाही लोकप्रतिनिधी आहे. परत एक महत्वाची गोष्ट म्हणजे मागील १५-२० वर्षात काम करताना माझ्याकडून कळत-नकळत काही गोष्टी करायच्या राहून गेल्या असतील किंवा माझ्याकडून काही जवळचे लोक व मतदार दुखावले गेले असतील, काहींची कामे होण्यात अडचणी निर्माण झाल्या असतीलतर मी ती कामे करण्यास सदैव प्रयत्नशील राहील व भविष्यात नक्कीच त्यात माझ्याकडून सुधारणा करेल. आपसातील हेवेदावे, वाद-विवाद विसरून आपणास परत एकदा फक्त आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रित येऊन काम करायचे आहे. आपण माझ्या या हाकेला साद देणारच आहात याची मला खात्री आहे. शेवटी सर्वांचे पुनःश्च एकदा प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) यांनी जाहीर आभार मानले आहे.