चिखली (Buldhana) :- गटविकास अधिकारी यांच्या आदेशानुसार प. स. चे विस्तार अधिकारी जुमडे यांनी मेरा बु येथे 13 डिसेंबर रोजी सकाळी 12 वाजता जिल्हा परिषद,पंचायत समिती विकास आराखडा व संकल्पनाधारित ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करणेबाबत संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सरपंच, ग्रामसेवकव, शिक्षक, अंगणवाडी सेविकांची उपस्थिती
कार्यशाळेत विस्तार अधिकारी जुमडे यांनी मार्गदर्शन केले की शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद विकास आराखडा तयार करण्याबाबत वर नमूद शासन निर्णय व परिपत्रकांकडे लक्ष वेधण्यात येत आहे. यामध्ये नमूद केलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीने ग्रामसमेमार्फत निवडलेल्या एक किंवा दोन संकल्पनांची नोंद Vibrant Gram Sabha Portal ऐवजी eGram Swaraj पोर्टलवर करावी. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम संसाधन गटाची स्थापना करावी. संकल्पनाधारित (Thematic) ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने दोन ग्रामसभा आयोजित करावयाच्या आहेत.
ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने दोन ग्रामसभा आयोजित
पहिल्या ग्रामसभेमध्ये प्रारूप आराखडा तयार करावयाचा असून, त्याची छाननी तालुका स्तरीय तांत्रिक छाननी समितीने केल्यानंतर, अंतिम आराखड्यास दुसऱ्या ग्रामसभेमध्ये मंजुरी घ्यावयाची आहे. पहिल्या ग्रामसभेपूर्वी प्रत्येक ग्रामपंचायतीने खालील चार सभा घ्यावयाच्या आहेत. यावेळी मेरा बु, चंदनपूर, अंत्री खेडेकर, कवढळ, येथील सरपंच गजानन वायाळ, श्रीकांत इंगळे, ग्रामसेवक विशाल धनवे , प्रदीप साळवे, संतोष सवडतकर, व्ही आर इंगळे, एस बी सोळंकी, मुख्याध्यापक एम डी पडघान, इंगळे, सोरमारे भगत, अंगणवाडी सेविका, शारदा हिवाळे, मिरा खादे, सविता आराख, चंद्रकोर कऱ्हाडे , शांता सोळंकी, आशा गिरी,मिना अंभोरे , प्रभाताई कुमठे, शाहीनबी पटेल, सुनीता डोंगरदिवे, इंदूबाई काळे, वदंना सुर्वे, कांता पडघान, व आशा सेविका यांची उपस्थिती होती.