बुलडाणा (Buldhana Lok Sabha) : स्वतःच्या यशासाठी व त्यातील फायद्यासाठी झटणारे अनेक नेते ठिकठिकाणी सापडतील, परंतु महायुती धर्माचे पालन करत स्वतःला झोकून देत दुसऱ्यासाठी जीवाचे रान करणारा नेता म्हणजे (MLA Sanjay Kute) आ. संजय कुटे. २००९ पासूनच बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या (Lok Sabha constituency) महायुतीच्या यशात त्यांनी केलेली मेहनत ही मोलाची ठरली आहे. यावर्षी तर बुलढाण्यासह अकोला व मुक्ताईनगरची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती, विशेष म्हणजे या तिन्ही मतदार संघात लढत काट्याची होती. परंतु पक्ष निरीक्षक म्हणून अचूक नियोजन करत, या तिन्ही मतदार संघातील विजयाचा मार्ग आ. संजय कुटे यांच्यामुळे सुकर झाला. प्रत्येक वेळी जसे बोलले तशीच त्यांनी करून दाखवले, आता तर त्यांनी ज्यांच्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा केली ते (Buldhana Lok Sabha) बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार (Prataprao Jadhav) प्रतापराव जाधव व रावेर मतदारसंघाच्या (MP Raksha Khadse) खासदार रक्षाताई खडसे या दोघांनाही (PM Modi) पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून मिळालेले स्थान, ही आमदार कुटे (MLA Sanjay Kute) यांची मान स्वाभिमानी उंचावणारी घटना असल्याचे प्रतिपादन भाजप प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी केले आहे.
बुलढाणा, अकोला व मुक्ताईनगरच्या यशात आ. संजय कुटेंचा सिंहाचा वाटा!
लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल हाती आला अन् महायुतीचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलढाणा, अकोला व (Raver Constituency) रावेर लोकसभा मतदार संघात महायुतीचा भगवा याहीवर्षी दिमाखात फडकला असून प्रतापराव जाधव, रक्षाताई खडसे व अनुप धोत्रे यांचा विजय विदर्भ व विदर्भाच्या सीमेवर होणारी भाजपाची पडझड थांबवणारा ठरला.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघ (Lok Sabha constituency) हा भाजपाकडे घेण्याचे नियोजन सुरू झाले होते, परंतु ज्यावेळी मतदारसंघात शिवसेनेकडे कायम राहणार असे ठरले.. त्यावेळी पहिले ट्विट आ. डॉ. संजय कुटे (MLA Sanjay Kute) यांनी करून प्रतापराव जाधव यांचा विजय नरेंद्र मोदींसाठी महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन केले होते. दोन महिन्याआधीच त्यांनी लोकसभा निवडणुकीचे अशोक नियोजन करायला सुरुवात केली. जळगाव जामोद मतदार संघात प्रतापरावाना सोबत घेऊन महीनाभर आधी विविध विकास कामांचे भूमिपुजन केले, त्यामुळे घाटाखाली त्याचा भरपुर फायदा प्रतापरावाना झाला. (Prataprao Jadhav) प्रतापराव यांनाच लोकसभेचे तिकिट मिळावे, यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले. प्रचार सुरु झाल्यानंतर प्रचाराची धुरा हाती घेत आ. आकाश फुंडकर यांना सोबत घेऊन घाटाखाली जोरदार फिल्डिंग लावली. त्यात शेगांव येथील समन्वय बैठक, खामगांव येथील भव्य प्रचार सभा, जळगाव जामोद येथील बाइक रैली आदी कार्यक्रम यशस्वी केले, त्याचाच परीपाक माहिती उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य मिळाले.
निवडून आल्यानंतर खा. प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांना मंत्रीपद मिळावे, याकरीता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी चर्चा करुन त्यांना मंत्री करावे, हा आग्रह करीत त्यांचा यशात खारीचा वाटा उचलला. यासोबत आ. डॉ. संजय कुटे (MLA Sanjay Kute) यांची पक्षाने रावेर लोकसभा मतदार संघाची ज़बाबदारी देत निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. तिथेही त्यांनी प्रचाराच्या अंतिम टप्यात जोरदार प्रचार करत रक्षाताईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. एक सक्षम महिला म्हणून रक्षाताईंच्या मंत्रीपदासाठीही जोरदार फिल्डिंग त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे लावले असल्याचे विनोद वाघ यांनी सांगितले.
अकोला लोकसभा मतदार संघाचे नवनियुक्त (MP Anup Dhotre) खासदार अनुप धोत्रे यांनी सुद्धा आपल्या भाषणात आ. डॉ. संजय कुटे (MLA Sanjay Kute) यांचे जाहिर आभार व्यक्त करत त्यांच्यासाठी बाळापुर व अकोला मतदारसंघात आ. कुटे यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या, त्याचा धोत्रे यांना फायदा झाला. भाजप व शिवसेना विशेषतः एकनाथ शिंदे गट यांच्यामध्ये समन्वयाचे काम अगदी सुरुवातीपासून आ. संजय कुटे (MLA Sanjay Kute) यांनी लिलिया केले आहे. सुरत-गुहाटीपासून त्यांनी ही जबाबदारी पेलली आहे, त्यासाठी काही वेळा त्यांना विरोधकांची टिकाही सहन करावी लागली. पण महायुतीसाठी कशाचीही पर्वा न करता, आ. संजय कुटे झोकून देऊन काम करत राहिले. परिणाम दिसलाच, एकीकडे विदर्भ व मराठवाड्यात भाजपाची पतझड होत असताना, आमदार संजय कुटे यांनी त्यांच्या बुलढाणा, अकोला व रावेर लोकसभा मतदार संघात हा पराभव थोपवून विजय मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले.. आणि त्यावर कळस म्हणजे बुलढाणा (Buldhana Lok Sabha) व रावेरच्या दोन्ही खासदारांना केंद्रात मंत्रीपद मिळाले !
एकंदरीत, बुलढाणा, रावेर आणि अकोला लोकसभा जागेसाठी आ. डॉ. संजय कुटे (MLA Sanjay Kute) यांचे प्रयत्न फळाला आले आहेत. त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी सुद्धा ही बाब फायदेशीर ठरणार आहे. यासोबतच मुंबईसह दिल्लीतही आ. डॉ. संजय कुटे यांचे वजन वाढणार, यावर या सर्व प्रयत्नांना आलेल्या यशाने शिक्कामोर्तब झाले आहे.. एवढे मात्र निश्चित !