बुलडाणा(Buldana):- ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ ही महाराष्ट्र शासनाच्या (Government of Maharashtra) पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत राबविण्यात राबविण्यात आलेल्या चळवळीत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अमरावती विभागातून बुलढाणा नगर परिषद ही सलग चौथ्या वर्षी अव्वल ठरली असून, तिला तब्बल ७५ लाख रुपयांची बक्षीस मिळाले आहे. आ. संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्यासह नगरपरिषद प्रशासनाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या अभियानात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.
७५ लाखाचे मिळाले घसघशीत बक्षीस !
पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश.. या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित ‘माझी वसुंधरा’ अभियान हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २ ऑक्टोबर २०२० ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविण्यात येत आहे. ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ ही राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत राबविण्यात आले असून त्यात ४१४ नागरी संस्था व २२,२१८ ग्रामपंचायत अशा एकूण २२,६३२ स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग घेतला होता. या अभियानात सहभागी स्थानिक स्वराज्य संस्थांचे डेस्कटॉप मूल्यमापन फील्ड मूल्यमापन करण्यात येऊन त्यात अमृत गट नगरपालिका व नगरपंचायत गट तसेच ग्रामपंचायत गट.. या विभागात त्रयस्थ यंत्रणेमार्फत मूल्यमापन करण्यात आले. दोन्ही मूल्यांकनाचे गुण ठरवून जिल्हा विभाग व राज्यस्तरीय बक्षिसांची वितरण करण्यात आले. या सलग चौथ्या वर्षी बुलढाणा नगर परिषद ही या अभियानात अव्वल ठरली. त्यामुळे या अभियानासाठी बुलढाणा नगर परिषदेस ७५ लक्ष रुपयांचे अमरावती (Amravati)विभागातून पहिल्या क्रमांकाचे विशेष बक्षीस वितरित करण्यात आले.
पुढच्या वर्षी राज्यस्तरावर प्रथम येवू- आ. गायकवाड
माझी वसुंधरा 4.0 अंतर्गत मिळालेली रक्कम हरितपट्टे विकास आणि पर्यावरण पूरक कामांसाठी शासन निर्णयानुसार खर्च करावी लागणार आहे. मिळणाऱ्या रकमेतून हरितपट्टे विकसित करून बुलढाणा शहराची थंड हवेचे ठिकाण म्हणून असलेली ओळख पुन्हा निर्माण करू. पुढील वर्षी राज्य स्तरावर 5.0 अंतर्गत राज्यस्तरावर येण्याचा शर्थीने प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया आ. संजय गायकवाड यांनी व्यक्त केली.
सर्वांच्याच सहकार्याने शक्य- गणेश पांडे
मुख्यमंत्री सक्षम शहर योजना आणि आता 4.0 अंतर्गत परत एकदा अमरावती विभागात बुलढाणा नगर परिषदेचा प्रथम क्रमांक आला आहे. आ. संजय गायकवाड अन् जिल्हाधिकारी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन तसेच नगर परिषद अधिकारी कर्मचारी यांचे प्रयत्न व बुलढाणेकरांचे सहकार्य यामुळे हे शक्य झाले, असे या अभियानाचे कप्तान ठरलेले मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी सांगितले.