बुलढाणा (Buldhana):- शेगाव पंढरपूर पालखी मार्गावर वरवंड ता मेहकर नजीक आश्रम शाळेजवळ १७ जुलै रोजी पहाटे अनोळखी महिलेचा मृतदेह (dead body)आढळल्याने खळबळ उडाली होती.
सदर महिलेचा मृत्यू अपघातात झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली
त्याची माहिती जानेफळ पोलीसांना होताच जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार कैलास चतरकर, पो कॉ, गणेश शिंदे यांनी, घटनास्थळी धाव घेतली व व पंचनामा करून मृतदेह बुलढाणा येथे शासकीय रुग्णालयात(Government hospitals) पाठवाला तदनंतर ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी सदर मृतक महिलेची शोध पत्रिका तयार करुन जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशनला पाठवली तसेच व्यवसायिक कौशल्याचा उपयोग करून सदर महिलेची ओळख पटविण्यात जानेफळ पोलिसांना यश आले आहे. मृतक महिला जिजाबाई उर्फ कमल परसराम तायडे वय 56 वर्ष रा. गवढालां ता.खामगाव यांचे असल्याचे निष्पन्न झाले असून सदर महिलेचा मृत्यू अपघातात झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी जानेफळ पोलीस स्टेशनला आ.मु नंबर २०/२०४ कलम १९४ बिएनएनएस २०२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास ठाणेदार अजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार कैलास चतरकर हे करीत आहेत.