महिलांच्या सुरक्षाव रक्षणासाठी पोलीस विभाग कटिबद्ध- पोलीस निरीक्षक गरुड
बुलढाणा (Buldhana Police Department) :”सद्रक्षणाय खलनिग्रहाय..” हे ब्रीद घेऊन पोलीस विभागाअंतर्गत नागरिकांच्या रक्षणाचेच काम अहोरात्र सुरू असते. महिला आणि बालिकांसाठी अतिशय संवेदनशीलपणे पोलीस विभाग काम करीत आहे. महिलांच्या सुरक्षा आणि रक्षणासाठी पोलीस विभाग (Police Department) कटिबद्ध आहे, असे आवाहन (Buldhana Police) बुलढाणा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक माधवराव गरुड यांनी केले.
महा एनजीओ फेडरेशन पुणे व दिव्यज्योती बहुउद्देशीय संस्था, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने गोमय रक्षाबंधनाचा कार्यक्रम ग्रामीण पोलीस स्टेशन बुलढाणा येथे शनिवार 17 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना माधवराव गरुड म्हणाले की, दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे, त्यासाठी सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींनी तसेच जनतेचा सहभाग मिळाला तर गुन्हेगारीचे प्रमाण आपण कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकतो.
दिव्यज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून आम्ही महिलांना नेहमीच अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी त्यांचे समुपदेशन करीत असतो, असेही ते म्हणाले. (Police Department) पोलीस विभाग आमच्या पाठीशी राहिला, याचा आम्हाला आनंद वाटत आहे.. “दिव्यज्योती”च्या अध्यक्षा प्रा.ज्योती पाटील यांनी प्रस्ताविकातून सांगितले. यावेळी उपस्थित पोलीस बांधवांना प्रा. ज्योतीPoliPolicece पाटील, विजय किनवलकर, वैशाली तायडे यांनी राखी बांधून बांधून त्यांचे औक्षण केले. यावेळी पत्रकार गणेश निकम, संदीप वानखेडे व इतर पोलीस बांधव उपस्थित होते.