देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली ( Buldhana Police) : गरमीचे दिवस असल्याने घरातली मंडळी बाहेर झोपले होते. याचाच गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून कपाटातील दागदागिने व नगदी रुपये असा एकूण दिड लाखाचा ऐवज लंपास केला. मात्र चोरटे हे सीसीटिव्ही कॅमेरे मध्ये कैद झालेले दिसत आहे. ही घटना भरोसा येथे ५ मे रोजी सकाळी उघडकीस आली.
चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून दिड लाखाची पळविले
अंढेरा पोलीस स्टेशन (Chikhli Police) अंतर्गत येणाऱ्या भरोसा येथील भागवत नरहरी थुटटे वय ३५ वर्षे हे गरमीचे वातावरण असल्याने ते परिवारासह रात्री बाहेर झोपले होते. सकाळी सर्व झोपेतून उठले आणि घराचा दरवाजा पाहिला असता दरवाजाचा कडी कोंडा तुटलेला दिसला हे पाहून लगेच घरात प्रवेश केला तेव्हा घरातील लोखंडी कपाट उघडलेले दिसले आणि त्यातील ठेवलेली नगदी ६८ हजार ५०० रुपये त्याच बरोबर कपाटामध्ये सोन्या चांदीचे दागिने एक सोन्याचा नेकलेस हार वजने १५ ग्रॅम असा किमती अंदाजे ५७ हजार, दोन सोन्याचे ओम ३ हजार रुपये,.सोन्याची ज्योती अर्धा ग्रॅम किमती अंदाजे ३ हजार रुपये ,सोन्याची अंगठी अर्धा ग्रॅम वजनाची किमती अंदाजे ३ हजार रुपये ,चांदीचे छंद ,, चांदीचा करदोडा ,चांदीचे वाळे , असे कपाटामध्ये ठेवलेली एकूण १ लाख ३६ हजार ४०० रु चा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे.
चोरटे सीसीटिव्ही कॅमेरेमध्ये कैद
अशा तक्रारीवरून ()e अंढेरा ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मोरसिंग राठोड यांनी अज्ञात चोरट्या विरुध्द कलम ४५७,३८० भादंवी नुसार गुन्हा केला. गावातील सीसीटिव्ही कॅमेरे तपासले असता दोन अज्ञात चोरटे कॅमेरेमध्ये कैद झालेले पाहायला मिळत आहे .