१९५१ ते आजपर्यंत १८ खासदारांनी बुलढाण्याचे प्रतिनिधित्व केले.
देशोशती वृत्तसंकलन
बुलढाणा (Buldhana ) एकाच मतदार संघातून म्हणजे बुलढाणा लोकसभा मतदार संघातून (Buldhana Lok Sabha Constituency) सलग ४ वेळा खासदार बनण्याचा विक्रम प्रतापराव जाधव यांनी केला आहे. तर ३ वेळा सलग आमदार व ४ वेळा खासदार असे तब्बल ७ वेळा संसदीय प्रणालीच्या पातळीवर निवडून येण्याचा रेकॉर्डही त्यांच्या नावावर झाला आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या बुलढाणा लोकसभा निवडणुकीत प्रतापराव जाधव ( Prataprao Jadhav ) यांनी चौथ्यांदा विजय संपादन केला. त्यांचे प्रतिस्पर्धी प्रा. नरेंद्र खेडेकर (Prof. Narendra Khedekar) यांचा त्यांनी पराभव केला बुलढाणा लोकसभा मतदारसंघ स्वतंत्रपणे अस्तित्वात येण्यापूर्वी बुलढाण्याचा बराचसा भाग अकोला मतदारसंघात जोडला होता. साधारणतः १९५१ ते आजपर्यंत १८ खासदारांनी बुलढाण्याचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये काहींनी तीन-तीन वेळा विजय मिळवला आहे. मात्र शिवराम राणे हे सलग तीन वेळा विजय झाले होते. मुकुल वासनिक आणि आनंदराव अडसूळ यांना तीन वेळेस विजय मिळाला. परंतु हा विजय विभागून होता मात्र प्रतापराव जाधव यांनी प्रथमच सलग चारवेळा विजयी होण्याचा विक्रम नोंदविला आहे.
> शिवराम राणे सलग तिसन्यांदा खासदार झाल्याचा इतिहास
लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीचा कॉंग्रेसचा मतदारसंघ, स्वातंत्र्याची पार्श्वभूमी त्यास होती. त्यामुळे काँग्रेसने (Congress) नऊ वेळा मतदार संघाचे नेतृत्व केले. १९५७ मध्ये कॉंग्रेसच्या शिवराम राणे (Shivaram Rane) यांना बुलढाणा उमेदवारी दिली गेली. त्यानंतर १९६२ आणि १९६७ मध्ये राणे यांना पसंती मिळाली. १९७१ मध्ये मात्र यादव शिवराम महाजन काँग्रेसकडून विजयी झाले. १९७७ मध्ये प्रथमच आर के पी से दौलत गवई खासदार झाले. बगर कॉग्रेसी खासदारांमध्ये ते पहिले खासदार ठरले. त्यानंतरवासनिक पितापुत्र यांनी येथे चार वेळेस नेतृत्व केलेले आहे. बाळकृष्ण वासनिक १९८० मध्ये काँग्रेस कहून खासदार होते. १९८४ च्या निवडणुकीत बाळकृष्ण वासनिक यांनी त्यांचे चिरजीवमुकुलवासनिकयांना पुढे केले. १९८४, १९९१ व १९९८ असे ३ वेळा वासनिकांनी नेतृत्व केले. परंतु १९८९ मध्ये अपवाद आहेच. १९८९ मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. यावेळी बीजेपीचे सुखदेव नंदाजी काळे यांनी ही जागा जिंकली. १९९६ मध्ये मुकुल वासनिक यांचा पराभव करून सेनेचे आनंदराव अडसूळ खासदार झाले. परंतु पुढच्या निवडणुकीत त्यांचा देखील पराभव झाला होता. १९९८ मध्ये वासनिक पुन्हा खासदार म्हणून निवडून आले. १९९१ मध्ये म्हणजे एकच वर्षांनी झालेल्या निवडणुकीत त्याचाही पराभव झाला. त्यामुळे ठासनिः आणि अडसूळ हे सलग तीन वेळेस खासदार होऊ शकले नव्हते. मात्र शिवराम राणे सलग तिसन्यांदा खासदार झाल्याचा इतिहास
> प्रतापराव जाधव हे स्वातंत्र्यानंतरचे पहिले खासदार ठरलेत.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काही खासदारांनी तीन वेळेस विजय मिळविला आहे. शिवराम रंगो राणे यांचा बुलढाणा अपवाद वगळला तर हा विजय विभागून असाच होता. मात्र सातत्याने चार वेळेस विजयी होणारे प्रतापराव जाधव हे स्वातंत्र्यानंतरचे पहिले खासदार ठरलेत. २०२४ च्या विजयाने हा विक्रमही प्रतापराव जाधव यांच्या नावे आता नोंद झाला आहे.
सलग चौथ्यांदा खासदार होण्याचा प्रतापरावांचा विक्रम..
प्रतापराव जाधव यांनी २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे डॉ राजेंद्र शिंगणे यांचा २८ हजार ०७८ मतांनी पराभव केला होता. २०१४च्यानिवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे कृष्णराव इंगळे यांचा १ लाख ५९ हजार ५७९ मतांनी पराभव केला होता. २०१९ ला राष्ट्रवादीचे डॉ राजेंद्र शिंगणे यांचा त्यांनी १ लाख ३३ हजार २८७ मतांनी पराभव केला होता तर आता २०२४ला त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रा. नरेद्र खेडेकर यांचा २९ हजार ४६९ मतांनी पराभव केला. हा त्यांचा सलग चचचा विजय ठरला.