तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्या- जालिंदर बुधवत
बुलढाणा (Buldhana Shivsena) : गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये अति पावसाने जिल्ह्यात सर्व दूर हजेरी लावली. जलसाठा प्रकल्पांमधील “ओव्हर फ्लो” झालेली स्थिती एकंदरीत पर्जन्यमानाचे परिणाम दर्शवते. मोताळा तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हिरवं स्वप्न मातीमोल झाले आहे. त्यामुळे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत (Jalandar Budhwat) यांनी तहसीलदार मोताळा यांच्याकडे केली आहे. यावेळी (Buldhana Shivsena) शिवसैनिकांसह शेतकऱ्यांनी तहसीलदारांना घेराव घातला होता. त्यामुळे काही काळ तहसील परिसरात खळबळ उडाली होती. तत्पूर्वी नुकसान झालेल्या शेतात जालिंदर बुधवत यांनी भेट देऊन पाहणी केली. शेतकऱ्यांना धीर देण्याचे कामही केले. (Buldhana Shivsena) शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज तहसीलवर धडक देऊन तहसीलदारांना घेराव घातला. याबाबत निवेदन सादर केले.
याप्रसंगी चर्चा करत असताना जालिंदर बुधवत (Jalandar Budhwat) यांनी सद्यस्थितीत असलेले वास्तव तहसीलदारांना सांगितले. अस्मानी संकटाची मालिका शेतकऱ्यांसमोर जगायचं की मरायचं ? हा प्रश्न उभा करत आहे. शासनाचा कारभार हा नुसता घोषणात गुंतला आहे. पीक विम्याचे पैसे कधी मिळतील हा प्रश्न कायम असताना दोन दिवसात मोताळा तालुक्यात पुन्हा अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे हिरव स्वप्न मातीमोल केल आहे. जिल्ह्यात मृत साठ्यात असलेले काही प्रकल्प दोन दिवसातच ओव्हरलो झाले आहेत. मोताळा तालुका देखील त्याला अपवाद नाही. अनेक महसूल मंडळांमध्ये घरांमध्ये पाणी घुसून साहित्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ यंत्रणेने याची सर्वेक्षण करून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा करावी अशी आमची मागणी आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने शिवसेना आंदोलन करेल, असा इशाराही जालिंदर बुधवत (Jalandar Budhwat) यांनी दिला आहे.
निवेदन देतेवेळी निवेदन देतेवेळी रामदास सपकाळ अपंग सेल जिल्हा प्रमुख, उप जिल्हाप्रमुख सुनील घाटे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, युवासेना उप जिल्हा प्रमुख शुभम घोंगटे, किसान सेना तालुकाप्रमुख सुधाकर सुरडकर, अपंग सेल तालुका प्रमुख भागवत शिकारे, तालुका संघटक राजु बोरसे, अनंता शिप्पलकर, मुकुंदा शिरसागर, किरण हुंबड, संजय रोढे, विष्णू पाटील, निलेश पाटील, राजु सुरडकर, गजानन कुकडे, गुलाबराव व्यवहारे, भास्कर शिंदे, प्रवीण राजपूत, चंद्रसिंग साबळे, दगडू पाटील, दिलीप शेळके, संतोष निंबाळकर, दत्ता सपकाळ, आकाश दांडगे, निर्मलकुमार इंगळे, अनंता पाटील, राजू झुंजारके, अमोल नखोद, साहेबराव पाटील, शांताराम पाटील यांच्यासह शेतकरी बांधव, (Buldhana Shivsena) शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.