मातोश्रीनिष्ठ शिवसैनिकांनो हाक द्या, धावून येईल..
जिल्हा शिवसेनेच्या वतीने सत्कार व कार्यकर्ता मेळावा !
बुलढाणा (Buldhana Shivsena) : शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच एकनिष्ठ आहेत. बुलढाण्यातला आपला पराभव हा पराभव नसून नैतिक विजयच आहे. लढलेल्या दोन जागांपैकी आपला एकाच जागी पराभव झाला आहे. उद्धव साहेबांनी आपल्याला पाठीवर हात ठेवून लढण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आपण सर्व मातोश्रीनिष्ठ (Buldhana Shivsena) शिवसैनिकांसाठी संकटकाळी आपण केव्हाही धावून येऊ. तसेच सत्ताधाऱ्यांचा कुठलाही दबाव स्वीकारण्याची गरज नाही उलट त्यांच्यावरच वचक ठेवण्याचे काम आपण आगामी काळात करू, असे प्रतिपादन आ. सिद्धार्थ खरात (Siddharth Kharat) यांनी केले.
बुलढाणा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी कार्यकर्ता मेळावा व मेहकर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात (Siddharth Kharat) यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, वसंतराव भोजने, विधानसभा संपर्क प्रमुख राजेंद्र रावराणे, सौ. जयश्रीताई शेळके, महीला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. चंदाताई बढे, जिल्हा संघटक प्रा. डी. एस. लहाने, डॉ गोपाल बच्छिरे, जिल्हा समन्वयक संदीपदादा शेळके, युवासेना जिल्हाप्रमुख नंदु कऱ्हाडे, शुभम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाने खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने, नव्या जोशाने कामाला लागावे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. त्या अनुषंगाने पक्ष संघटन मजबूत करणे, सदस्य नोंदणी करणे इत्यादी विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या २३ जानेवारी रोजी होणाऱ्या जयंती निमित्त प्रत्येक पदाधिकारी व शिवसैनिकांनी त्यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी करावी, असे आवाहन मान्यवरांनी यावेळी उपस्थितांना केले.
या (Buldhana Shivsena) कार्यक्रमाला उप जिल्हाप्रमुख सुनील घाटे, बद्री बोडखे, आशिष रहाटे, तुकाराम काळपांडे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, विजय इंगळे, किसन धोंडगे, महेंद्र पाटील, दादाराव खार्डे, दिपक मापारी, गजानन वाघ, दिपक चांभारे, ईश्वर पांडव, श्रीराम खेलदार, शहरप्रमुख गजानन ठोसर, रमेश ताडे, भीमराव पाटील, गजानन जाधव, संजय वडतकर, दिलीप वाघ, वासुदेव बंडे पाटील, अशोक गव्हाणे, गजानन उबरहंडे, विजय इतवारे, गणेश पालकर, एकनाथ कोरडे, आशिष खरात, प्रा सिद्धेश्वर आंधळे, तसेच शिवसेना, युवासेना सेना, महीला आघाडी, सर्व अंगीकृत संघटनांचे जिल्हा प्रमुख, उप जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, उप तालुकाप्रमुख, विभागप्रमुख शाखा प्रमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आ.सिद्धार्थ खरात (Siddharth Kharat) म्हणाले की , आपल्याला अनेक वर्षापासून मंत्रालयातील विविध विभागातील टॉप टू बॉटम कामाचा अनुभव आहे . जिल्ह्याच्या विकासासाठी प्रशासकीय पातळीवरील कामाचा सातत्याने पाठपुरावा करू. बुलढाणा जिल्ह्यात (Buldhana Shivsena) महाविकास आघाडीने भक्कमपणे किल्ला लढवला. मात्र राज्यातील एकूणच निकाल हे धक्कादायक आहेत. जिथे चाळीस चाळीस हजाराने विजयी व्हायची शक्यता असताना काठावरचा विजय आणि पराभव आपल्याला पहावे लागले. सत्ता आणि मसल पावर पुढे आपला निसटता पराभव बुलढाणा येथे झाला. मात्र कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी खचून जाऊ नये.
सर्व शक्ती पणाला लावून आपण कायम पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या आणि एकनिष्ठ शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू, अशी ग्वाही देखील याप्रसंगी आ. सिद्धार्थ खरात (Siddharth Kharat) यांनी दिली. जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका पंचायत समिती आणि (Buldhana Shivsena) जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांच्या या निवडणूक आहेत. त्यामुळे सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने लक्ष घालून आपल्याला लढावं लागणार असल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांना निवडणुकीत पूर्णपणे बळ देणार असल्याचे यावेळी प्रा. नरेंद्र खेडेकर म्हणाले.