– राजवाडा समोरील भाजी मंडी व बाजूच्या सगळ्या टपरी या तत्काळ हटवून
राजवाडा परिसराचा श्वास मोकळा केला
बुलढाणा ( Buldhana ) सिंदखेड राजा येथील न.प. च्या नगराध्यक्षासह (mayor ) सदस्यांचा कार्यकाल (members) १९ एप्रिल रोजी संपला असून आता नगरपरिषद देता कारभार मुख्य अधिकारी तथा प्रशासक प्रशांत व्हटकर यांच्या हाती आला असून प्रशासक (administrator) हे ? क्शन मोडवर आले असून सिंदखेड राजा शहरातील अतिक्रमण काढण्यास २१ एप्रिल रोजी पासून प्रारंभ करण्यात आला गेल्या अनेक वर्षापासून सिंदखेड राजा शहर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले होते शहरातील अनेक नागरिकांचे रस्त्यालगत अतिक्रमण काढण्यात यावे अशा प्रकारची मागणी होती त्या अनुषंगाने नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रशांत व्हटकर (Prashant Vatkar) यांनी ? ऍक्शन मोडवर येत २१ मे २०२४ रोजी राजवाडा समोरील भाजी मंडी व बाजूच्या सगळ्या टपरीया तत्काळ हटवून राजवाडा परिसराचा श्वास मोकळा केला आहेत तसेच महामार्गावरील नालीच्या समोरच्या अतिक्रमण काढण्याची मोहीम सुद्धा हाती घेतली आहेत. त्या अनुषंगाने बस स्थानक (bus station) परिसरातील अनेक हॉटेल दुकान समोरील अतिक्रमण हटवण्याची धडक मोहीम हाती घेतली आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. मुंबई नागपूर महामार्गाचा (Mumbai Nagpur Highway) श्वास मोकळा होणार असल्याने पादचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहेत व प्रशासक प्रशांत व्हटकर टकर यांचं अभिनंदन सुद्धा करण्यात आला आहेत अशाच पद्धतीचं शहरातील नाल्यावरील अतिक्रमण काढण्याची मागणी शहरातून होत आहेत या मोहिमेमध्ये दोन ट्रॅक्टर जेसीबी (Tractor JCB) व नगरपरिषदचे सर्व कर्मचारी सहभागी झाले होते यात प्रमुख भूमिका म्हणून प्रशासक प्रशांत व्हटकर ठाणेदार ब्रह्मदेव शेळके नगर परिषदेचे पाणीपुरवठा अभियंता (Water Supply Engineer) सतीश वाकडे लेखापाल टेकाम प्रभारी आरोग्य निरीक्षक एन युइंगळे पोलीस कर्मचारी जीवन खारडे ज्ञानेश्वर दहातोंडे यांच्यासह पोलीस कर्मचारी हे अतिक्रमण काढण्यासाठी उपस्थित होते. राजवाडा परिसरात भाजीविक्रेते करणाऱ्या विक्रेत्यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलेया निवेदनात म्हटले आहे की भाजी मंडी राजवाडा परिसरातच भाजी विक्री करू देण्याची मागणी त्यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहेत.
– अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावेत – प्रशांत व्हटकर
सिंदखेडराजा नगरपरिषदेच्या (Municipal councils) वतीने अतिक्रम काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून ज्या अतिक्रमण धारकांच्या अतिक्रमणामुळे रहदारी ला अडचण होत असेल तसेच अतिक्रमण नाल्याच्यावरील अतिक्रमण काढले आहेत त्यांनी त्वरित हे अतिक्रमण काढून घ्यावेत अन्यथा नगरपरिषद च्या वतीने सर्व अतिक्रमण काढण्यात येईल व संबंधित अतिक्रमण धारकावर कारवाई करण्यात येईल. असे प्रशांत व्हटकर यांनी सांगितले