चिखली (Buldhana) :- विज वितरण विभागाच्या (Power Distribution Division) नियोजन शून्य कारभारामुळे अमोना येथील पशु पालक अनिल तातेराव वाघ यांची एक म्हैस व एका कुत्र्याचा गावठाण विद्युत ट्रान्सफार्मला (Electric transformer) शॉक लागून मृत्यू झाला. या विद्युत ट्रान्सफार्मच्या अपघातात मृत्यू (Death)पावलेल्या पाळीव जणांवराचा अद्यापही मोबदला देण्यात आला नाही.
दोन महिन्यात एक म्हैस व कुत्र्याचा मृत्यू
चिखली तालुक्यातील अमोना येथे दलित वस्तीमध्ये ट्रान्सफॉर्मर बसविलेला आहे. हा ट्रान्सफॉर्म गावालगत असून विद्युत तार (Electric wire) उघड्यावर आहेत. या बाबत अनेक वेळा गावातील लोकांनी उघड्यावरील वीज तार काढून टाका नाहीतर ट्रान्सफॉर्मरला जमिनीच्या पाच ते सहा फूट उंच बसवा तसेच संरक्षण म्हणून काही व्यवस्था करा असे सांगूनही वीज वितरण विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी दखल घेतली नाही. उलट जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. अशा या विजवितरण विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे अमोना गावातील पशु पालक अनिल तातेराव वाघ यांची एक लाखाची म्हैस 19 फेब्रुवारी 2024 ला विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या आर्थिक वायरला शॉक लागून दगावली असता विजवितरण विभागाने मोबदला देऊ असे आश्वासन दिले होते, परंतु अद्यापही मोबदला दिला नाही उलट आनखी एक पाळीव कुत्र्याचा शॉक (Shock) लागून मृत्यू झाला. अशा घटना घडत आहे जर विजवितरण विभागाने विद्युत ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती केली नाही तर मोठी जीवित हानी होवू शकते आणि त्याची संपूर्ण जबाबदारी विजवितरण विभागावर आल्या शिवाय राहणार नाही. तसेच संबंधित विभागाने तात्काळ अमोल तातेराव वाघ यांना मोबदला द्यावा अशी पशु पालकाकडून केली जात आहे.