चिखली (Buldhana):- एका महिलेने घरकूल बांधकामाचे बँकेतून पैसे काढले आणि काऊंटरच्या बाजूला होवून जवळच असलेल्या एका अनोळखी व्यक्तीकडून पैसे मोजून द्या असे म्हणून त्याच्याकडे पैसे दिले परंतु सदर व्यक्तीने त्या पैशातून आठ हजार पळविले . हा प्रकार मेरा खुर्द येथील बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) शाखेच्या सीसीटिव्ही कॅमेरे मध्ये कैद झाला आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या सीसीटिव्ही कॅमेरे मध्ये कैद
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मेरा खुर्द येथे एकमेव राष्ट्रीयकृत असलेली बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आहे . या शाखे अंतर्गत ८ ते १० गावे असल्याने दररोज बँकेत ग्राहकांची मोठी गर्दी असते. त्यातच बँकेत कर्मचारी (Employee) कमी असल्याने ग्राहकांना तासनतास रांगेत उभे राहून आथिर्क व्यवहार (economic behavior) करावा लागतो. असे असतांनाही सुध्दा बँकेने अनेक ग्राहकांच्या बचत खात्याला होल्ड लावले असल्याने ग्राहकांना त्यांच्या आधार लिंक वर पैसे काढता येत नाही. त्यामुळे ग्राहकांना बँकेत पैसे काढण्यासाठी मानसिक त्रास (mental distress) सहन करावा लागतो आहे. अशाच गर्दी मध्ये मेरा बु येथील कावेरी पवार ही विवाहित महिला घरकूल बांधकामाचे पैसे काढण्यासाठी बँकेत गेली आणि २० हजार रुपयाचा विड्रोल(Withdrawal) देवून पैसे काढले आणि काऊंटर च्या बाजूला होवून जवळच असलेल्या एका अनोळखी व्यक्तीला माझे पैसे मोजून द्या असे म्हणून त्या व्यक्तीच्या हातात पैसे दिले परंतु त्या व्यक्तीने महिलेची नजर चुकवत २० हजार रुपयातून ८ हजार रुपये बाजूला काढून घेतले आणि महिलेला तुमचे २० हजार रुपये बरोबर आहे, असे म्हणून महिलेच्या हातावर पैसे देवुन बँकेतून निघून गेला.
सदर व्यक्तीने पैसे मोजतांना तोंड रुमालाने बांधलेले असून सदर व्यक्ती कोण आहे हे समजले नाही
मात्र पैसे मोजून देताच फरार झाल्यानें महिलेला संशय आला आणि पुन्हा मुलाला पैसे मोजावे लावले असता ८ हजार रुपये कमी असल्याचे कळाले . सदर व्यक्ती शोधला असता मिळून आला नाही. हा प्रकार महिलेने बँकेच्या कर्मचाऱ्यांना सांगितला असता बँक कर्मचाऱ्यांनी लगेच बँकेचे सीसीटिव्ही कॅमेरे तपासले तेव्हा सदर व्यक्तीने पैसे मोजतांना तोंड रुमालाने बांधलेले असून सदर व्यक्ती कोण आहे हे समजले नाही . त्यामुळे महिलेने या घटनेची तक्रार अंढेरा पोलीस स्टेशनला दिली आहे. त्यामुळे आता सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये कैद झालेला अनोळखी व्यक्तीचा शोध आणि महिलेचे पळविले पैसे याचे याचा तपास अंढेरा पोलीसांना लागतो किंवा नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे .