चिखली (Buldhana) :- स्थानिक चिखली येथील श्री.शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयात(colleges) दि.२६ जुलै 2024 रोजी १३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी (Maharashtra Battalion NCC) खामगाव येथील कमांडिंग ऑफिसर कर्नल (Commanding Officer Col) अमित भटनगर रिसालदार मेजर धर्मेंद्र सिंह ट्रेनिंग जेसीओ सुभेदार राजेंद्र पाल, सुभेदार सचिन ठुबे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मीना निकम, आयक्यूएसी समन्वयक डॉ. वनिता पोच्छी यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी विभागाद्वारे कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.
‘कॅप्टन विक्रम बत्रा’ यांनी प्राणाची आहुती देत विजय संपादित केला
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.मीना निकम प्रमुख मार्गदर्शक कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.दिलीप उन्हाळे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. खंडाते, गणित विभागाच्या प्रमुख प्रा.पुनम वैद्य, इतिहास विभागातील प्रा.सतीश काळे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेफ्ट. किरण पडघान यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात हा विजय दिन साजरा करून यामध्ये शहीद झालेले कॅप्टन विक्रम बत्रा (Captain Vikram Batra) सारख्या सर्व सैनिकांनी आपल्या प्राणांची अहूती देऊन विजय संपादित केलेला होता. त्यांना या दिवशी मानवंदना देऊन, आपले सैनिक किती विपरीत परिस्थितीत राहून त्या ठिकाणी विजय मिळविलेला आहे.
26 जुलै 1999 पर्यंतचा सर्व इतिहास इतिवृत्तची मांडणी केली
याबद्दल विजय गौरव गाथा व्हिडिओ क्लिप्स त्यांना दाखविण्यात आल्या. या कार्यक्रमांचे मार्गदर्शक प्रा.सतीश काळे यांनी या इतिहासाची सर्व पार्श्वभूमी व सुरुवात स्वातंत्र काळापासून कशी झालेली होती. काश्मीरचा मुद्दा कशाप्रकारे उपस्थित झालेला होता 26 जुलै 1999 पर्यंतचा सर्व इतिहास इतिवृत्तची मांडणी केली. प्रा.डी.आर. उन्हाळे यांनी आपल्या मार्गदर्शनात देशाची फाळणी व त्या फाळणीमध्ये कश्मीरबद्दल (Kashmir)राहिलेली एक सांप्रदायिकता व तो मुद्दा याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. मीना निकम यांनी विद्यार्थ्यांना आपण उघडे डोळे ठेवून सर्व बघितले पाहिजे. तसेच आपल्या महाविद्यालयात एनसीसी युनिट आहे. ते आपल्या मध्ये देशाच्या प्रती देशप्रेम जागृत होण्यासाठी जी काही भावना निर्माण करते. ते विद्यार्थ्यांना वयाच्या साडे सोळाव्या वर्षी देश संरक्षणासाठी आपला सर्व देह त्याग करून, आपल्या कुटुंबाचे नावलौकिक (Reputation) करण्यासाठी सैन्यात भरती होतात. सियाचीन व ग्लेसर या ठिकाणी किती कठीण व बिकट परिस्थितीत आपले कर्तव्य बजावत असतात. की ज्यामुळे आपण सर्व व देश शांततेत राहू शकतो.
कारगील युद्धामध्ये शहीद झालेल्या सर्व शहिदांना मानवंदना दिली
त्यामुळे आपण त्यांचा नेहमीसाठी आदर केलाच पाहिजे. व या कारगील युद्धामध्ये शहीद झालेल्या सर्व शहिदांना मानवंदना दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन (Coordination) कॅडेट नेहा शेळके, तर अभारप्रदर्शन सीनियर अंडर ऑफिसर (Senior Under Officer) तन्वी भालेराव यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा. दिपक मावळे,प्रा.प्रतिभा चिखले, प्रा.राम पवार, प्रा.पवन बनसोडे, प्रा. सागर जाधव, प्रा.अजित तरांळे, प्रा.दिपाली टाले, प्रा.रोहिणी डवरे, प्रा.मधुलिका चिकटे व सर्व एनसीसी कॅडेट उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता एनसीसी गीताने करण्यात आली.




