बुलढाणा अर्बनचे राधेश्याम चांडक त्यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
बुलढाणा (Radheshyam Chandak) : केवळ भारतातच नव्हेतर आशिया खंडात पतसंस्था क्षेत्रात आर्थिकच नव्हे तर सामाजिक उपक्रमांची विक्रम करणाऱ्या बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक (Radheshyam Chandak) उपाख्य भाईजी, हे सहसा सोशल मीडियावर सक्रिय नसतात. पण कधी कधी ते ज्या काही पोस्ट करतात त्या बहुचर्चित करतात!
महाराष्ट्र सरकार निवडणुकीच्या तोंडावर सध्याची योजनांची खैरात वाटत आहे, मागेल त्याला महामंडळ देऊन तोंडाला पाणी पुसण्याचा प्रयत्न करत आहे “लाडकी बहीण” (CM Ladki Bahin Yojana) व “लाडका भाऊ” सारख्या ज्या योजना राबवत आहे. त्यापेक्षा जर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची प्रगती करावयाची असेल अन फुकटच्या योजना पासून सुटकारा मिळवायचा असेलतर महाराष्ट्र शासनाने केवळ “लाडका विद्यार्थी” हीच योजना राबवावी, अशी भूमिका त्यांनी “फेसबुक” वरून व्यक्त केली आहे.
त्या पोस्ट मधून राधेश्याम चंडक (Radheshyam Chandak) म्हणतात की- “मला असे वाटते की, महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण, लाडका भाऊ या (CM Ladki Bahin Yojana) योजना राबवल्यापेक्षा जर “लाडका विद्यार्थी” ही योजना (Ladka Vidyarthi Yojana) राबवलीतर पूर्ण महाराष्ट्राचे चित्र बदलेल. आज महाराष्ट्र देशामध्ये शिक्षण क्षेत्रात सातव्या क्रमांकावर आहे. आणि हे असेच चालू राहिले तर महाराष्ट्र हा नक्कीच दहाव्या, अकराव्या क्रमांकावर जाईल. सर्वांनी या गोष्टीचे चिंतन करावे”
विशेष म्हणजे राधेश्याम चांडक (Radheshyam Chandak) यांच्या या फेसबुक पोस्ट सकारात्मक प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे!