चिखली (Buldhana) :- बुलढाणा विभागीय नियत्रंण अधिकारी शुभांगी शिरसाट यांनी चुकीच्या तक्रारीची कोणत्याही प्रकारची सखोल चौकशी न करता चिखली आगार विभागातील तीन कर्मचाऱ्यांवर अन्याय करून नियमबाह्य पद्धतीने निलंबित केले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे तात्काळ निलंबन मागे घावे अन्यथा चिखली आगार विभागातील सर्व वाहक चालक काम बंद आंदोलन करतील असे निवेदन २ ऑगस्ट रोजी बुलढाणा विभागीय नियंत्रक अधिकारी यांना दिले आहे .
आगार विभागातील सर्व वाहक चालक काम बंद आंदोलन करतील
निवेदनात नमूद केले आहे की चिखली वरुण जळगाव जाण्यासाठी अनेक एसटी बसेस (ST Bus)असतांना सदर विद्यार्थीनी त्या बसेस मध्ये गेली नाही उलट चुकीच्या तक्रारी वरुण विभागीय कार्यालया कडून दि. ३१ ऑगस्ट रोजी चिखली आगार विभागातील सहाय्यक वाहतुक निरीक्षक एस एच भाँडे, वाहतुक निरीक्षक – श्री वि. ओ. लामकाने व वाहक श्री टि.एस. देशपांडे या कर्मचा-यांना विभागीय कार्यालयाच्या संदभीय पत्रानुसार निलंबित केलेले आहे. सदर केलेले निलंबन हे नियमबाहय असून तडकाफडकीचे व अन्यायकारक आहे. त्यामुळे चिखली आगार कृती समिती या निलंबनाचा निषेध करित प्रशासनला सत्य परिस्थीती व उपलब्ध पुरावे उघडकीस केले की वाहतुक नियंत्रक कक्षातील जळगाव जाणाऱ्या बसेसची नोंद बस क्र एम एच २० बी एल १९३९ माहूरगड ते जळगाव हि बस मार्गस्थ बिधाड झाल्यामुळे चिखली आगारातील कार्यशाळेत सदर बसचा बिघाड दुरुस्ती बाबत नोंद कार्यशाळेतील नोंदवहीत केलेली आहे.
सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे निवेदनात नमूद
१२.३० ते १३.३० या वेळेत तीन बसेस चिखली वरुण जळगाव साठी सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे सदर विद्यार्थीनी या बसेस मध्ये का गेली नाही हा प्रश्न उपस्थित होतो त्यामूळेनियमबाह्य निलबित झालेले तीनही कर्माच्याऱ्यांनी आपल्या कामात कोणतीही कसुर केलेली किंवा चुक केलेली नाही. तिन्ही कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य निभावले आहे. या उलट तक्रारकर्ते यानी सपूर्ण विषयाची माहीती नसतांना तसेच एका तासामध्ये जळगाव जाण्यासाठी तीन बसेस उपलब्ध असताना समोरील प्रवास का केला नाही?, याबाबत तक्रारकर्ते यांना विचारणा व्हावी, बस मध्ये तांत्रिक दोष असताना समोरील कि. मी. पूर्ण करणे म्हणजे प्रवाश्यांच्या सुरक्षेते संबंधी प्रश्न उद्भवला असला तरी या प्रकरणाचा आपण नमुद केलेला मुद्द्यांचे निरीक्षण करून निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबन तात्काळ मागे घ्यावे अन्यथा आगार कृतिसमिती मार्फत दि.०६ सप्टेंबर पासून कामबंद आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलना दरम्यान आगारातील औदयोगिक शांतता भंग झाल्यास सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे निवेदनात नमूद केले आहे .
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी बुलढाणा ,सुरक्षा आणि कार्यक्षमता अधिकारी, N.P. बुलढाणा , आमदार श्वेताताई महाले पाटिल, ठाणेदार पोलिस स्टेशन चिखली, आगार व्यवस्थापक रा.प. चिखली यांना पाठविलेल्या आहेत.