बुलढाणा(Buldhana):- काँग्रेस मधून शिवसेना (Uddhav Balasaheb Thackeray) गटात गेलेल्या सौ. जयश्री सुनील शेळके यांना, दुसऱ्या यादीत स्थान देण्यात आले असून.. त्यांची उमेदवारी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून फायनल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे चार दिवसापूर्वीच शिवबंधन बांधल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना एबी फॉर्म दिला होता, मात्र त्यानंतर आलेल्या पहिल्या यादी त्यांचे नाव आले नव्हते.. आता त्यांच्या नावाची घोषणा दुसऱ्या यादीत झाली आहे.
शिवबंधन बांधल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना एबी फॉर्म दिला
सौ. जयश्री सुनील शेळके या समाजकारणातून राजकारणात आलेल्या महिला नेत्या आहेत. पुरोगामी विचाराची परंपरा लाभलेल्या व त्याकाळी आदर्श गाव ठरलेल्या सावरगाव डुकरे, हे त्यांची माहेर असून शिरपूर हे त्यांचे सासर. उत्तमराव पाटील व भाऊसाहेब शेळके, असा त्यांना माहेर व सासरचा सामाजिक व राजकीय वारसा आहे. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जिजाऊ ब्रिगेड या चळवळी त्या सक्रिय झाल्या, जिजाऊ ब्रिगेडच्या त्या पहिल्या महिला प्रदेशाध्यक्ष होत्या. याच चळवळीतील शिवराज्य पक्षाकडून त्यांनी 2009 ला चिखली विधानसभा निवडणूक लढवली होती, ती निवडणूक त्यांनी केवळ चळवळ म्हणून ते लढवल्यामुळे त्यात त्यांचा पराभव झाला होता. मात्र त्यानंतर त्या काँग्रेस पक्षात आल्या, साखळी जिल्हा परिषद सर्कल त्यामधून त्या विजयी झाल्या.. दरम्यान त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची (Assembly constituencies) तयारी सुरू केली, 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठीही त्यांनी जोरदार प्रयत्न केले.
बुलढाणा विधानसभेची जागा ही महाविकास आघाडीत शिवसेना गटाकडे असल्यामुळे, अखेर प्रभावी उमेदवार म्हणून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हाती शिवबंधन बांधले, हातात एबी फॉर्म घेतला व आज शनिवार 26 ऑक्टोबर रोजी त्यांना ठाकरे गटाने अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.