भाजप प्रदेशाध्यक्षाशी सविस्तर संवाद साधून.!
बुलढाणा (Buldhana) : विदर्भ विकास महामंडळाचे (Vidarbha Development Corporation) माजी अध्यक्ष तथा माजी आमदार तुकाराम बीडकर (Tukaram Bidkar) यांचे अकोला जिल्ह्यात शिवणी विमानतळावरुन बाहेर पडल्यावर अपघाती निधन झाले. तत्पूर्वी त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष ना. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांचेशी संवाद साधला होता. तर विमानतळावर बावनकुळे यांना निरोप देण्यासाठी ते उपस्थित होते. यावेळी विमानाने टेकऑफ घेतल्यानंतर त्यांचा शेवटचा फोटो हा कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर (Akash Phundkar) यांच्याशी विनोदी गप्पा करतांनाचा आहे.
विदर्भात ओबीसी नेते (OBC Leaders) समजल्या जाणारे तथा सध्या भारतीय जनता पार्टीत (BJP) कार्यरत असणारे तुकाराम बीडकर यांचे गुरुवार 13 फेब्रुवारी रोजी अपघाती निधन झाले. विशेष म्हणजे हा त्यांचा अपघात शिवनी विमानतळावरुन भाजपा प्रदेशाध्यक्ष ना. चंद्रशेखर बावनकुळे यांना निरोप देऊन बाहेर पडल्यावर कार्यकर्त्यांच्या मोटारसायकलवर ते मागे जात असतांना झाला. ते शेवटच्या फोटोत ना. आकाश फुंडकर व माजी आमदार विजयराज शिंदे (Vijayraj Shinde) यांचेसोबत गप्पा करतांना दिसतात. हा फोटो बुलढाणा येथील भाजप पदाधिकारी तथा पत्रकार चंद्रशेखर बर्दे (Chandrasekhar Barde) यांनी त्यांच्या मोबाईलमधून टिपला होता.
बीडकरांच्या निधनाचे वृत्त दुःखद ना. जाधव
ना. जाधव माझे मित्र तथा मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे (Vidarbha Statutory Development Board) माजी अध्यक्ष तुकाराम बीडकर यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या निधनाने विकासाच्या ध्येयासाठी सातत्याने लढणारे निष्ठावान व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याच्या शोकसंवेदना केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव (Union Minister No. Prataprav Jadhav) यांनी व्यक्त केल्या.