हिंगोली (Akshaya Tritiya) : अक्षय तृतीयेनिमित्त कोणतेही शुभकार्य करण्याचा अधिक मान असतो, विशेषत: सराफा बाजारपेठ मध्ये अनेकजण सोने, चांदी खरेदी करीत असतात. साडेतीन (Akshaya Tritiya) मुहूर्तापैकी पहिले विशेष पर्व असल्याने बुधवारी सराफा बाजार पेठमध्ये चांगलीच तेजी होती. त्यामुळे या ठिकाणी लाखोंची उलाढाल झाली आहे.
३० एप्रिल बुधवार रोजी (Akshaya Tritiya) अक्षय तृतीयेचा सन साजरा करण्यात आला. या शुभदिनी सोने खरेदी, नवीन वस्तू खरेदी, वाहन खरेदी, भूमिपुजन आणि नवीन व्यवसाय सुरू करणे शुभ मानले जाते. त्यामुळे अनेकांनी विविध वस्तू खरेदीचा बेत काही दिवसापूर्वीच आखला होता. साडेतीन मुहूर्तापैकी पहिले विशेष पर्व असल्याने सकाळपासूनच हिंगोली शहरातील बाजर पेठमध्ये अनेक वस्तू खरेदी करीता ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती.
विशेष म्हणजे सराफा बाजारपेठ मध्ये सोने खरेदीकरीता ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत होती. मागील काही दिवसापासुन सोन्याचे दर वाढले असले तरी तेजी मात्र कायम असताना बुधवारी देखील ही तेजी पहावयास मिळाली. २४ कॅरेटच्या सोन्याचे दर प्रति तोळा ९७ हजार रुपये होते. तर २२ कॅरेटच्या सोन्याचे दर प्रति तोळा ९० हजार रुपये आणि चांदी १ किलो १ लाख १ हजार रुपये असे दर होते. त्यामुळे अनेक ग्राहकांनी (Akshaya Tritiya) सराफा बाजारपेठ मध्ये जाऊन शुभदिनी सोने खरेदीवर भर दिला होता.




