२१ ते २३ जानेवारीला प्रहारच्या वतीने जंगी शंकरपट
दुचाकी वाहनांसह लाखोंची बक्षिसे
चांदूर बाजार (Bahiram Yatra) : विदर्भातील सर्वात जास्त काळ चालणारी ऐतिहासिक व पुरातन असलेल्या (Bahiram Yatra) बहिरम बाबा यात्रा महोत्सवात २१ ते २३ जानेवारी दरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रहारच्या शंकरपटाची पंचक्रोशीतील नागरिक आतुरतेने वाट बघत असतात. यावर्षी विजेत्या स्पर्धकांना दुचाकी वाहनांसह लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहे. (Bachu Kadu) बच्चू कडू यांच्या संकल्पनेतील हे आयोजन असून मागील वीस वर्षांपासून निरंतर हे आयोजन सुरू आहे.
२१ जानेवारी रोजी या जंगी शंकरपटाचे उदघाटन असून माजी आ. राजकुमार पटेल, उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव,शल्यचिकित्सक डॉ. प्रभुजी जवंजाळ,चांदुर बाजार येथील तहसीलदार रामदास शेळके, ठाणेदार महेंद्र गवई, गटविकास अधिकारी नारायण आमझरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या शंकरपटाचे उदघाटन होणार आहे. वीस वर्षांपासून निरंतर बच्चू कडू या यशस्वी शंकरपटाचे आयोजन करत असून विदर्भात या शंकरपटाचा नावलौकिक आहे.दूरवरून या शंकरपटात स्पर्धक सहभागी होतात हे विशेष.
दोन गटात होणाऱ्या या (Bahiram Yatra) शंकरपटाच्या स्पर्धकांना दुचाकी वाहने व लाखोंची बक्षिसे देण्यात येणार आहेत.२३ जानेवारी रोजी अमरावती मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे,संचालक नरेशचंद्र ठाकरे, जयप्रकाश पटेल,सुनिलभाऊ वऱ्हाडे, अजय मेहकरे, आनंदभाऊ काळे, चित्रा प्रशांत डाहाणे, यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे. तरी या जंगी शंकरपटात सहभागी होण्याचे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी केले आहे.
शंकरपट ही बच्चू कडू यांची संकल्पना
श्री क्षेत्र बहिरम बाबा यात्रा (Bahiram Yatra) महोत्सवाला अतिशय पुरातन आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मात्र काही वर्षांपूर्वी तमाशाची परंपरा या यात्रेत लाभली होती. तमाशामुळे अनेकांचे कुटुंब उघड्यावर आले, अनेकांचे संसार मोडले मात्र ही परंपरा मोडकळीस आणायचे काम वीस वर्षांपूर्वी बच्चू कडू यांनी केले.तमाशा बंद करण्यासाठी बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी जेव्हा पुढाकार घेतला तेव्हा येथील व्यापारी वर्ग त्यांच्या व्यवसायाला घेऊन चिंतेत होते मात्र बच्चू कडू यांनी म्हटले होते की तमाशा बंद झाला तर दुप्पट व्यवसाय होईल.आणि त्यानंतर या यात्रेचे महत्व आणखी वाढत गेले. बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी यात्रा महोत्सव दरम्यान याठिकाणी शंकरपट, शासन आपल्या दारी योजना, असे अनेक उपक्रम याठिकाणी राबवले. विशेष म्हणजे महिला वर्ग या यात्रेपासून लांब होत्या परंतु तमाशा बंद झाल्यानंतर महिला वर्ग आपल्या कुटुंबांसह याठिकानी येत असल्याने या यात्रेमध्ये गर्दीने उच्चांक गाठला आहे.
शेतकरी यांची यात्रा म्हणून प्रसिद्धी
बहिरम बहीरम यात्रा (Bahiram Yatra) महोत्सव दरम्यान यात्रे शेतकरी आणि शेती उपयोगी लागणारे साहित्य मिळत होते आता काळा नुरूप शेती मध्ये झालेली औद्योगिकीकरणाची प्रगती त्यामुळे साहित्य यात्रे मध्ये दिसत नाही. शेतकऱ्यांसाठी ही यात्रा नेहमीसाठी आठवणीत राहावी म्हणून या ठिकाणी शेती उपयोगी वस्तू चे विक्री खरेदी हे व्यवहार मोठे प्रमाणात आजही होत असतात. याचा विचार डोक्यात ठेवून कडू यांनी या यात्रेमध्ये शंकरपट तसेच शेतकऱ्याच्या संदर्भित ज्या काही घडामोडी आहे पशुप्रदर्शनीचे आयोजन दरवर्षी या ठिकाणी केले जात जातात.
शहीद शेतकरी दुतोंडे यांच्या स्मृती प्रित्यार्थ सभागृह
इंग्रज काळी या ठिकाणी शेतकरी नेते दादासाहेब हावरे यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक असे कापूस आंदोलन झाले होते. त्यावेळी इंग्रज यांनी शेतकरी यांच्या वर गोळीबार केला. त्या दरम्यान शेतकरी विठ्ठलराव दूतोंडे शहिद झाले होते.त्यांच्या स्मृती प्रित्यार्थ सभागृह आणि स्मारक बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी या ठिकाणी बांधले आहे.
गाडगेबाबांनी तोंडली बळी प्रथा
बहिरम हे ठिकाण मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असल्याने या (Bahiram Yatra) बहिरम बाबाचे भाविकभक्त हे मध्य प्रदेश महाराष्ट्र दोन्ही राज्यात आहे .त्यामुळे या ठिकाणी नवास बोलले जात होते नवस पूर्ण झाल्यानंतर बळी देण्याची प्रथा या ठिकाणी पुरातन काळापासून सुरू होती. गाडगेबाबांनी या ठिकाणची बळीची प्रथा बंद पाडली, तर तत्कालीन आमदार बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी या ठिकाणी सुरू असलेले तमाशा आंदोलन तसेच कायदेशीर लढाई लढत बंद केले. त्यामुळे ही यात्रा शेतकरी आणि जनसामान्य यांची यात्रा म्हणून आज पंचक्रोशीतील प्रसिध्द आहे.