कारंजा (Washim):- दुचाकी अपघातात आई , बहीण व भाऊ असे तिघे जण गंभीर जखमी (seriously injured) झाले. अपघाताची ही घटना कारंजा- पिंजर मार्गावरील शिवनगर व तुळजापूर या दोन गावांच्या मधोमध सोमवारी, 20 मे रोजी दुपारी 4 वाजता च्या दरम्यान घडली.
उपचारासाठी बाहेरगावी पाठविण्यात आल्याची माहिती
एम. एच. 28 ए .के. 1422 क्रमांकाच्या दुचाकीने (Two Wheeler) आई , बहीण व भाऊ असे तीन जण पिंजर येथून कारंजाकडे येत असताना मार्गातील अपघातस्थळी उधळलेल्या बैलाने (bull) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकीसह ते खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. शारदा मते वय 45, वर्ष वृषाली मते वय 23 वर्ष व अक्षय मते व 21 वर्ष अशी जखमींची नावे असून ते बार्शीटाकळी तालुक्यातील भेंडी काजी येथील रहिवासी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका (Ambulance) चालक रमेश देशमुख यांनी जखमींना उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात (Hospital) दाखल केले. परंतु तेथील उपचारादरम्यान त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बाहेरगावी पाठविण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे