सोन्या-चांदीचे दागिने, रोकड लंपास!
परभणी (Burglary) : शहरातील त्रिमुर्ती नगरात एक घर तर साई कॉर्नर भागात ऑनलाईन सर्व्हिसेसचे दुकान फोडून चोरट्यांनी सोन्या- चांदीचे दागिने, रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणी २८ ऑक्टोबरला नानलपेठ पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्ञातावर नानलपेठ पोलिसात गुन्हा!
त्रिमुर्ती नगरामध्ये चोरट्यांनी घरफोडी करत सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम मिळून ४७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना २७ ऑक्टोबरच्या सायंकाळी सात ते २८ ऑक्टोबरच्या सकाळी सहा या दरम्यान घडली. सदर प्रकरणी वैâलास शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याच दरम्यान शास्त्री नगर येथील संजय राऊत यांच्या घरी देखील चोरीचा प्रयत्न झाला. प्रकरणाचा तपास पोह. थोरवट करत आहेत. तसेच साई कॉर्नर येथे असलेल्या नवीद ऑनलाईन सर्व्हिसेस या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी टेबलच्या ड्रॉवरमधील ४५ हजार रुपये रोख चोरुन नेले. ही घटना २८ ऑक्टोबरच्या सकाळी उघडकीस आली. शेख नवीद यांच्या फिर्यादीवरुन अज्ञातावर नानलपेठ पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोह. लिंगायत करत आहेत.




