पुसद (Pusad):- शहराच्या सर्वच रस्त्यांवर विशेष करून शाळा महाविद्यालय परिसरात असलेल्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चुरी असल्यामुळे यावरून दुचाकी श्री फोन अपघाताच्या (Accidents)घटना घडत आहेत.
प्रशासनाने या विषयाला गांभीर्याने घेतले नाही
यापूर्वी दैनिक देशोन्नतीने (Dainik Deshonnati)या संदर्भात प्रशासनाची लक्ष वेधले होते. मात्र प्रशासनाने या विषयाला गांभीर्याने घेतले नाही. एखाद्या नागरिकांचा किंवा मुलांचा महिलांचा विद्यार्थी विद्यार्थिनींचा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. लहान लहान मुले शाळा महाविद्यालयामध्ये जातात त्यांच्यासमोर असलेल्या रस्त्यांवर जर चुरी असेल व त्यावरून विद्यार्थी विद्यार्थिनी किंवा महिला अथवा नागरिक यांचा दुचाकी स्लिप होऊन जर अपघात घडला तर करायचे काय? यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग तथा नगरपालिका प्रशासन यांनी आता ॲक्शन मोडवर येणे गरजेचे आहे हे विशेष.